Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार २२, २०२३ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार २२, २०२३

चिराग दारूवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
 

राशिभविष्य

मेष : श्रीगणेश सांगतात की, आजचे ग्रहमान अनुकूल रखडलेल्या कामांना गती देईल. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतील. कोणतेही नवीन काम किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक निर्णय घ्‍या प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर करा.

वृषभ

वृषभ : आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सकारात्मक उर्जेचा अनुभव येईल. यामुळे तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल, असे श्रीगणेश म्‍हणतात. तरुणाईसाठी लाभदायक दिवस. मुलांच्या समस्याकडे लक्ष द्‍या, व्यवसायासंबंधी कामे मंद होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

राशिभविष्य

मिथुन : आज तुम्‍ही आपल्या मनोबलाने सकारात्मक परिणाम प्राप्त करू शकता. चुकीच्या कामात वेळ वाया घालवू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कामातील सकारात्‍मक विचार तुमच्‍यासाठी फायदेशीर ठरेल. पती-पत्नीमधील नाते मधूर राहिल. तणाव आणि राग यापासून लांबच राहा.

कर्क

कर्क : आज मुलाच्या करिअर आणि शिक्षणाशी संबंधित चिंतांचे निराकरण होईल. तुमच्या वैयक्तिक कामांवरही लक्ष केंद्रित करू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. कर्मावर विश्वास ठेवणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन लोकांशी व्यवहार करताना चर्चा करुनच निर्णय घ्‍या. कौटुंबिक वातावरणात आनंदी राहील. अशक्तपणा आणि सांधेदुखीचा त्रास होवू शकतो.

सिंह

सिंह : आज व्यस्त वेळापत्रकातून थोडावेळ तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी काढा. तुम्हाला उत्साह वाटेल. कोणतेही काम शांतपणे विचार करूनच पूर्ण करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. प्रतिकूल परिस्थितीत संयम राखा. कौटुंबिक जीवन सामान्य राहील.

कन्या

कन्या : आज ग्रहमान सकारात्मक परिस्थिती निर्माण करत आहे, असे श्रीगणेश सांगतात. गरजू आणि ज्येष्ठांची सेवा करण्यात तुम्हाला विशेष रस असेल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आज उत्पन्नाची स्थिती चांगली राहील. घरात आनंदी वातावरण असू शकते. गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवेल.

तुळ

तूळ : आज तुमचा धार्मिक कार्यात चांगला वेळ जाईल. प्रभावशाली लोकांसोबतचा संपर्क तुम्‍हाला लाभदायक ठरेल, असे श्रीगणेश सांगतात. तरुणांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्‍यावे मौजमजेत वेळ वाया घालवू नये. व्यवसायात मार्केटिंगशी संबंधित कामांवर अधिक लक्ष द्या. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

राशिभविष्य

वृश्चिक :आज समस्या सोडवण्यात तुमची विशेष भूमिका असेल, असे श्रीगणेश सांगतात. एखाद्या वेळी थकवा आल्याने अशक्तपणा जाणवू शकतो. खर्च वाढणार असल्‍याने बजेटची काळजी घेणे आवश्यक आहे. पैशाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. बर्‍याच दिवसांनी कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल.

राशिभविष्य

धनु : आज अनोळखी व्यक्तीची भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रगतीचे नवीन मार्गही मिळू शकतात, असे श्रीगणेश सांगतात. मुलांकडून सुवार्ता मिळाल्‍याने मन प्रसन्न राहील. आज आत्मविश्वास कमी झालाय असे वाटेल. योग आणि ध्यानाची मदत घ्‍या. सहकारी आणि कर्मचारी यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. तुमची वागणूक कुटुंबातील सदस्यांना अस्वस्थ करु शकते.

राशिभविष्य

मकर : वैयक्तिक आणि आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या योजना असतील, असे श्रीगणेश सांगतात. मुलांच्‍या समस्यांवर उपाय शोधण्यात तुम्हाला आनंद मिळू शकतो. व्यवसायात अनुभवी व्यक्तीच्या मदतीने चांगली ऑर्डर मिळणे शक्य आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू शकते. आरोग्‍याकडे दुर्लक्ष नको.

कुंभ

कुंभ : आज मानसिक आणि आध्यात्मिक आनंद मिळेल. इच्छित कामे वेळेवर पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. नकारात्मक विचारांपासून लांब राहा. स्वतःला व्यस्त ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मीन

मीन : श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. पूर्ण ऊर्जा आणि आत्मविश्वासाने स्वतःला कामात झोकून द्या. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. मुलांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. पती-पत्नी सोबत मिळून घराच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकाल.

Back to top button