अर्थज्ञान : विमा काढताय? डीमॅट खातेही हवे!

अर्थज्ञान : विमा काढताय? डीमॅट खातेही हवे!
Published on
Updated on

राधिका बिवलकर :  नव्या वर्षात सर्व प्रकारच्या विमा खरेदीसाठी डीमॅट खाते बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी नियामक संस्था 'इर्डा'ने काही दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार डिसेंबरनंतर कोणतीही विमा पॉलिसी ही कागदी स्वरूपात मिळणार नाही.

विमा कंपन्यांकडून पॉलिसी ही संबंधितांना डिजिटल फॉर्मेटमध्ये डीमॅट खात्यात उपलब्ध करून दिली जाईल. सध्या या योजनेवर विमा कंपन्यांकडून वेगाने काम केले जात आहे. यानुसार पॉलिसीधारक आगामी काळात डीमॅट खाते सुरू करतील, अशी अपेक्षा आहे. आपल्याकडेही पॉलिसी असेल, तर तत्काळ डीमॅट खाते सुरू करा, जेणेकरून पॉलिसीचे नूतनीकरण, मॅच्युरिटी किंवा क्लेमसाठी कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.

डीमॅट खाते म्हणजे काय?

डीमॅट खात्याची व्यवस्था ही सध्या शेअर बाजाराला लागू आहे. एखादी व्यक्ती शेअर खरेदी करत असेल, तर कंपनीकडून संबंधित शेअर हा डिजिटल फॉर्मेटमध्ये डीमॅट खात्यात ट्रान्सफर केला जातो. शेअर बाजारात कागदी स्वरूपात शेअर ट्रान्सफर केले जात नाहीत. हीच व्यवस्था आता विमा कंपन्यांसाठी देखील लागू होणार आहे. विमा कंपन्यादेखील आता कागदी स्वरूपात कोणत्याही स्वरूपात विमा पॉलिसी जारी करणार नाहीत. एवढेच नाही, तर विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती ही त्याच्या डीमॅट खात्यात स्थानांतरित केली जाईल.

कशामुळे गरज?

विमा पॉलिसीला डिजिटल मोडवर उपलब्ध करून देण्याचा मुख्य हेतू म्हणजे एकदा डीमॅट खात्याला पॉलिसी जोडली की, त्याचे नूतनीकरण, मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारे लाभ, दाव्याची प्रक्रिया सुलभ होईल. विशेषत: आरोग्य विमा किंवा अपघात विम्याच्या बाबतीत दावा दाखल करणे आणि कंपनीकडून त्याचा निपटारा करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.

डीमॅट खात्याला ठेवा सुरक्षित

सध्या ऑनलाईन व्यवहाराचा बोलबाला असल्याने फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. डीमॅट खाते देखील त्याला अपवाद नाही. मग, ते शेअरसाठी असो किंवा पॉलिसीसाठी सुरू केलेले असो. ऑनलाईन फसवणुकीचा धोका हा नेहमीच राहिला आहे. यासाठी डीमॅट खाते सुरू करताना आपला मोबाईल क्रमांक अपडेट करणे गरजेचे आहे. या आधारावर व्यवहाराचे अ‍ॅलर्ट वेळोवेळी मिळत राहील. याशिवाय डीमॅट खात्याचे पासवर्डदेखील वेळोवेळी बदलत राहा आणि कोणालाही त्याची माहिती देऊ नका.

पॉलिसीधारकांची संख्या 50 कोटींवर

एका आकलनानुसार देशात सध्या 50 कोटींपेक्षा अधिक विमा पॉलिसी आहेत. या पॉलिसीधारकांना डिसेंबरच्या अगोदर डीमॅट खाते सुरू करावे लागणार आहे. या सर्व पॉलिसीधारकांनी वेळेत हे खाते सुरू करणे गरजेचे आहे. कारण, खाते सुरू करण्याची डेडलाईन जवळ आल्यास गर्दी होऊ शकते. या गर्दीत आपले खाते सुरू झाले नाही, तर विमा पॉलिसीच्या नूतनीकरणात अडचणी येऊ शकतात.

डीमॅट खाते कोठे सुरू करावे?

डीमॅट खाते सुरू करण्यासाठी पॉलिसीधारकांना फारशी भटकंती करावी लागणार नाही. बँकात आणि परवानाप्राप्त संस्थांकडे हे खाते सुरू करता येऊ शकते. बँकात आणि सेबीच्या मान्यप्राप्त ब्रोकरकडून डीमॅट खाते सुरू करता येते. त्याची देखभाल नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडियाकडून केली जाते.

कोणत्या कागदपत्रांची गरज?

एखादे बचत खाते सुरू करण्यासाठी आपल्याला जी प्रक्रिया करावी लागते, तीच प्रक्रिया डीमॅट खाते सुरू करतानादेखील लागते. अर्थात, बँक खात्याच्या तुलनेत हे खाते सुरू करणे अधिक सुलभ राहू शकते. खाते सुरू करणार्‍या व्यक्तीने पॅन आणि आधार क्रमांक गरजेचे आहे.

विमाधारकाकडून खाते कसे हाताळले जाईल?

डीमॅट खाते सुरू केल्यानंतर विमाधारकास आपल्या पॉलिसीचे विवरण पाहावयाचे असेल, तर यासाठी आपल्याला आयडी अणि पासवर्ड लॉगइन करावे लागेल. हा क्रमांक विमा कंपनीकडून दिला जाईल. खात्यात लॉगइन करण्यासाठी आधार नंबरशी निगडीत बायोमेट्रिक ओळख आणि ओटीपीचादेखील वापर केला जाईल.

जुन्या ग्राहकांनी सुरू करावे खाते

नव्या गाईडलाईननुसार विमा कंपन्यांकडून जुन्या पॉलिसीलादेखील डिजिटल रूपात आणले जात आहे. यासाठी सर्व पॉलिसीधारकांनी डीमॅट खाते तत्काळ सुरू करावे, अन्यथा पॉलिसी नूतनीकरण करताना किंवा दावा दाखल करताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

सध्या मोफत, नंतर शुल्क

डीमॅट खात्याची सुविधा सध्या मोफत आहे; मात्र तज्ज्ञांच्या मते, कालांतराने हे खाते सुरू करताना एक हजार ते दीड हजारापर्यंत रक्कम मोजावी लागू शकते. आपल्याकडे शेअर्स नसतील आणि विमा पॉलिसी नसेल, तर सध्या विनाशुल्क डीमॅट खाते सुरू करायला हवे. कालांतराने त्याच्यावर शुल्क आकारले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news