

Why Noel Tata opposed N Chandrasekaran Tata Sons Chairman reappointment: टाटा सन्सने गुरूवारी झालेल्या बोर्ड मिटिंगमध्ये दोन मोठे निर्णय घेतले. त्यात चेअरमन एन चंद्रशेखरन यांना पुढच्या ५ वर्षांसाठी पुन्हा एकदा टाटाची धुरा सोपवण्यात आली. तसेच आरबीआयच्या कडक नियामांमुळे टाटा सन्सचे शेअर्स आता ओपन मार्केटमध्ये आणण्यासाठी सहमती झाली आहे.
या निर्णयानंतर एन चंद्रशेखरन यांना तिसरा कार्यकाळ मिळाला आहे. त्यांचा दुसरा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये संपुष्टात येणार आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये चंद्रशेखरन यांनी बोर्डाला फेब्रुवारी २०२७ नंतर आपला कार्यकाळ संपल्यानंतर पदावर राहू इच्छित नाहीत.
एन. चंद्रशेखरन आणि नोएल टाटा यांच्यातील वाद जगजाहीर आहे. नोएल टाटा टाट ट्रस्टचे चेअरमन असून रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. नोएल टाटा यांना सोडून बाकीच्या सर्व बोर्ड सदस्यांनी एकतर्फी मतदान करून एन. चंद्रशेखरन यांची बाजू घेतली होती. मात्र आता एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या निर्णयाला वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मंजुरी मिळणे गरजेचे आहे. यात टाटा ट्रस्टची हिस्सेदारी ६६ टक्के आहे.
बोर्डाने पुढच्या ५ वर्षासाठी एन. चंद्रशेखरन यांना चेअरमन निवडण्यासोबतच टाटा सन्सचा आयपीओ लाँच करण्यावर सहमती दर्शवली आहे. आयपीओच्या प्रस्ताववर बोर्डाची सहमती येणे हा ऐतिहासिक निर्णय आहे. मात्र या निर्णयामागे कायदेशीर हतबलता देखील आहे.
या महिन्यात भारतीय रिजर्व बँकेने टाटा सन्सला एनपीएफपी नोंदणीकरण सरेंडर करण्याचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर कंपनीसाठी नवीन आयपीओ आणणे गरजेचे झाले होते. अशामध्ये बोर्डाने गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि शेअऱ बाजारात कंपनीला लिस्ट करण्यासाठी एन चंद्रशेखरन यासारख्या अनुभवी नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.
टाटा सन्सच्या बोर्ड मिटिंगमध्ये टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा यांनी एन. चंद्रशेखरन यांना ५ वर्षाचे एक्स्टेंशन देण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. नोएल टाटा यांचे म्हणणे होते की ज्यावेळी चंद्रशेखरन यांनी स्वतः पद सोडण्याची घोषणा केली आहे. तर बोर्डाने नवा उत्तराधिकारी शोधला पाहिजे.
नोएल टाटा यांच्या मते टाटा समुहाच्या नियमानुसार एक्झिक्युटिव्ह ६५ वर्षाचे झाल्यावर निवृत्त होतात. ५ वर्षाचे एक्स्टेंशन देण्याने चंद्रशेखरन हे ७० वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. चंद्रशखरन हे ६५ वर्षाचे असून त्यांचा कार्यकाळ २०३२ मध्ये संपुष्टात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नोएल आणि एन. चंद्रशेखरन यांच्यात धोरणात्मक आणि वित्तीय मतभेद देखील समोर आले आहेत. नोएल टाटा ग्रुपच्या काही सेक्टर्समध्ये जसं की एअर इंडिया, डिजीटल व्हर्टिकल्समधील आर्थिक कामगिरी, मोठे कर्ज आणि वाढता खर्च याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यावर कडक नजर ठेवली पाहिजे अशी मागणी नोएल यांनी केली आहे.