Gen Z Jobs: Gen Z कर्मचाऱ्यांची कंपन्यांमधून का होतेय हकालपट्टी! अभ्यासात समोर आलं धक्कादायक कारण

Gen Z Workplace Challenges: नव्या अभ्यासात उघड झाले आहे की कंपन्या Gen Z कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे विश्वास दाखवत नाहीत. हायरिंगनंतर काही महिन्यांतच 60% Gen Z कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे.
Gen Z  Jobs
Gen Z JobsPudhari
Published on
Updated on

Why companies fire Gen Z: मिलेनियल्स आणि जनरेशन अल्फाच्या दरम्यान जन्मलेल्या पिढीला जेनरेशन Z म्हटले जाते. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली ही तरुण पिढी इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानासोबत वाढलेली असल्याने त्यांना "डिजिटल नेटिव्ह" किंवा “झूमर्स” असेही संबोधले जाते. तंत्रज्ञानातील प्रावीण्य असूनही, कॉर्पोरेट जगतात Gen Zची नोकरी सुरक्षित नसल्याचे ताज्या अभ्यासातून दिसून आले आहे.

कॉर्पोरेट जगतात Gen Zची अडचण वाढली

सुमारे 1000 हायरिंग मॅनेजर्सवर केलेल्या सर्वेक्षणातून एक चिंताजनक बाब समोर आली आहे ती अशी की, 6 पैकी 1 हायरिंग मॅनेजर Gen Z कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना विचार करतो.

Intelligent.com ने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 60% कंपन्यांनी Gen Z कर्मचाऱ्यांना कामावर घेतल्यानंतर काही महीन्यांतच नोकरीवरून काढले आहे. यामागे त्यांनी सांगितलेल्या प्रमुख कारणांमध्ये—

  • मोटिव्हेशनची कमतरता,

  • कम्युनिकेशन स्किल्स कमी असणे,

  • अनप्रोफेशनल वर्तन

Gen Z  Jobs
IPL 2026: IPL आधीच मोठा धक्का! रवींद्र जडेजा CSKमधून बाहेर; BCCIने ट्रेड झालेल्या खेळाडूंची यादी केली जाहीर

Gen Z कर्मचाऱ्यांची कंपन्यांमधून वेळेआधीच Exit

सर्वेक्षणातील 1000 कंपन्यांपैकी 500 कंपन्यांनी मान्य केले की Gen Z कर्मचाऱ्यांना नवीन स्किल्स आत्मसात करण्यात अडचणी येतात. तसेच—

  • 46% कंपन्यांनी प्रोफेशनलिझम नसल्याची तक्रार केली,

  • 21% कंपन्यांनी हे तरुण कामाचं प्रेशर सहन करु शकत नाहीत असं सांगितलं,

  • 20% कंपन्यांनी ते काम सुरू करण्यात उशीर करतात असं सांगितलं.

याशिवाय

  • 39% कंपन्यांनी Gen Zकडे कम्युनिकेशन स्किल्स नाहीत,

  • 34% समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता कमी असल्यामुळे
    कंपन्यांनी त्यांना वेळेपूर्वीच काढण्याचा विचार करतात.

अभ्यासात असंही समोर आलं की 79% कंपन्यांनी Gen Z कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन (PIP) मध्ये टाकावं लागलं. पण त्यानंतरही 60% कर्मचाऱ्यांना अखेरीस नोकरी गमवावी लागली. Gen Z कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनातील आव्हाने नवीन नाहीत, परंतु कॉर्पोरेट क्षेत्रात या पिढीची संख्या वाढत चालल्यामुळे या समस्या अधिक गंभीर होत आहेत.

Gen Z  Jobs
Ravindra Jadeja: जडेजाला CSK का सोडायची आहे? रवी शास्त्रींनी सांगितलं खरं कारण!

ResumeBuilder.com च्या एप्रिल महिन्यातील सर्वेक्षणात 74% मॅनेजर्स आणि बिझनेस लीडर्सनी स्पष्ट सांगितलं की, Gen Z सोबत काम करणे, त्यांच्या स्वतःच्या पिढीसोबत काम करण्यापेक्षा अधिक कठीण आहे.

त्यांच्या मते Gen Zच्या अपेक्षा खूप जास्त असतात, पण वर्क कल्चर, नियम, जबाबदारी यांची त्यांना पुरेशी समज नसते. यामुळेच अनेक कंपन्या नव्याने ग्रॅज्युएट झालेल्या तरुणांना नोकरी देताना दोन-तीन वेळा विचार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news