Budget 2024 | .. तर पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना EPFO ​​खात्यात मिळणार १५ हजार

रोजगारासाठी सरकारच्या खास पॅकेजची घोषणा
Budget 2024
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मोठ्या घोषणा केल्या Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांसाठी अनेक खास घोषणा केल्या आहेत. रोजगार सृजन फोकस्डची घोषणा करत त्या म्हणाल्या की, पहिल्यांदा नोकरीत प्रवेश करमाऱ्यांना सरकार अतिरिक्त पीएफचा लाभ देईल. यासाठी सरकार त्या लोकांच्या पीएफ खात्यात १५ हजार रुपये जमा करेल. (Budget 2024)

Budget 2024
Budget 2024 LIVE Updates | तरुणांना टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी; दरमहा मिळणार ५ हजार भत्ता

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांसाठी एका मोठी घोषणा केली आहे. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, सर्व औपचारिक क्षेत्रांमध्ये वर्क फोर्समध्ये एंट्रीवर पहिल्यांदा काम करणाऱ्यांना एक महिन्याचे वेतन मिळणार. हे एका महिन्याच्या वेतनाचा प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) 15,000 रुपयांपर्यंत तीन हप्त्यांमध्ये दिले जाईल. पहिली नोकरी करणाऱ्यांसाठी १ लाख रुपयांहून कमी पगार असलेल्यांना याचा फायदा होईल. याचा फायदा २.१ लाख तरुणांना मिळण्याची अपेक्षा आहे.

Budget 2024
Budget 2024 | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - शेती, शेतीसंबंधित घटकांसाठी १ लाख ५२ हजार कोटी - निर्मला सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?

, "...सर्व औपचारिक क्षेत्रातील कामाच्या ठिकाणी नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींना एक महिन्याचे वेतन दिले जाईल. EPFO ​​मध्ये नोंदणीकृत प्रथमच कर्मचाऱ्यांना ३ हप्त्यांमध्ये एका महिन्याच्या पगाराचा थेट लाभ हस्तांतरण रु. 15,000 पर्यंत असेल.

Budget 2024
Budget 2024| केंद्रीय अर्थसंकल्‍पात महिला आणि मुलींसाठी मोठी घोषणा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news