Union Budget 2026 | ५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्‍या असलेल्‍या शहरांच्‍या विकासासाठी ११.२ लाख कोटींचा 'बूस्टर डोस'

Union Budget 2026 | आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षात रक्कम १२.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचेही संकेत
Union Budget 2026 | ५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्‍या असलेल्‍या शहरांच्‍या विकासासाठी ११.२ लाख कोटींचा 'बूस्टर डोस'
Published on
Updated on

Union Budget 2026 urban infrastructure

नवी दिल्ली : देशातील वाढते नागरीकरण आणि व्यापार वृद्धी लक्षात घेता, सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठी पाऊले उचलली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी भविष्य-सज्ज भारताच्या निर्मितीसाठी आणि विशेषतः ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर II आणि टियर III शहरांमधील विकास केंद्रांना बळकटी देण्यासाठी अनेक प्रमुख पायाभूत सुविधा उपक्रमांची रूपरेषा मांडली.

5 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्‍या असलेल्‍या शहरांसाठी भरीव निधी

५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर-२ आणि टियर-३ शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने ११.२ लाख कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे, आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षात ही रक्कम १२.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

Union Budget 2026 | ५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्‍या असलेल्‍या शहरांच्‍या विकासासाठी ११.२ लाख कोटींचा 'बूस्टर डोस'
Union Budget 2026 : स्वतंत्र भारतातील असे दोन अर्थमंत्री, जे अर्थसंकल्प सादर करू शकले नाहीत… त्यामागे होते मोठे कारण

रिअल इस्टेट आणि खासगी विकासकांना बळ

२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सार्वजनिक भांडवली खर्च (Capital Expenditure) १२.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. खाजगी विकासकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 'पायाभूत सुविधा जोखीम हमी निधी' (Infrastructure Risk Guarantee Fund) तयार केला आहे. या निधीअंतर्गत, प्रकल्पांमधील जोखीम कमी करण्यासाठी सरकार अंशतः हमी देणार आहे. यामुळे खाजगी गुंतवणुकीला वेग येईल. तसेच, शहरांमधील जुन्या इमारती आणि जागांचा वापर वाढवण्यासाठी 'रिअल इस्टेट पुनर्वापर योजना' राबवण्यात येणार आहे.

Union Budget 2026 | ५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्‍या असलेल्‍या शहरांच्‍या विकासासाठी ११.२ लाख कोटींचा 'बूस्टर डोस'
Union Budget 2026 | 'युवा शक्ती'ला प्रोत्‍साहन, वंचितांना आधार; अर्थमंत्री सीतारामन यांनी मांडला अर्थसंकल्पाचा 'रोडमॅप'

मालवाहतूक व्यवस्थापन आणि स्वतंत्र मालवाहतूक मार्गिकांचा विस्तार

मालवाहतूक अधिक वेगवान आणि स्वस्त करण्यासाठी एक समर्पित 'फ्रेट कॉरिडॉर' बांधला जाणार आहे. या योजनेचा एक मुख्य भाग म्हणजे पूर्वेकडील दानकुनी (पश्चिम बंगाल) पासून पश्चिमेकडील सुरत (गुजरात) बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवली जाईल. यामुळे देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीमधील व्यापार सुलभ होणार आहे.

Union Budget 2026 | ५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्‍या असलेल्‍या शहरांच्‍या विकासासाठी ११.२ लाख कोटींचा 'बूस्टर डोस'
Union Budget 2026 | कर्तव्य भवनात सादर झालेला पहिला अर्थसंकल्प, सरकारची तीन कर्तव्ये…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news