Tata Motors shares | कमाई ७० टक्क्यांनी वाढूनही टाटा मोटर्सचा शेअर का घसरला?

Tata Motors shares |
Tata Motors shares | कमाई ७० टक्क्यांनी वाढूनही टाटा मोटर्सचा शेअर का घसरला?
Published on
Updated on

प्रसाद पाटील

टाटा मोटर्सच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांनंतर शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. या निकालांच्या पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल आणि नुवामा या अग्रगण्य ब्रोकरेज संस्थांनी दिलेले निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरचे ‘न्यूट्रल’ रेटिंग कायम ठेवले आहे. या समभागासाठीची टार्गेट प्राईस 414 रुपये प्रति शेअर ठेवली आहे.

ब्रोकरेजच्या मते, कंपनीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे असली तरी, निव्वळ नफा त्यांच्या अंदाजापेक्षा थोडा कमी राहिला आहे. देशांतर्गत व्यावसायिक वाहन (उत) उद्योगातील अनिश्चितता आणि नजीकच्या काळात मार्जिनवर येणारा दबाव लक्षात घेता त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. 2026-28 या कालावधीत महसूल आणि नफ्यामध्ये 10 टक्क्यांपर्यंत चक्रवाढ वृद्धी (उअॠठ) होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने यासाठी ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले आहे. 480 रुपये प्रति शेअर टार्गेट प्राईस दिली आहे.

नुवामा या समभागाबाबत सकारात्मक असून त्यांनी सध्याच्या किमतीपेक्षा 41 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. व्यावसायिक वाहन क्षेत्रातील तेजी कायम राहील आणि टाटा मोटर्सला त्याचा मोठा फायदा होईल, असे त्यांचे मत आहे. विशेषतः इंडोनेशियाकडून मिळालेली 70,000 वाहनांची मोठी ऑर्डर पाहता, निर्यातीमध्ये 48 टक्के वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

प्रमुख आर्थिक ठळक बाबी

महसूल : 24,452 कोटी रुपये (22% वाढ).

निव्वळ नफा : 2,406 कोटी रुपये (सुमारे 70% वाढ).

लाभांश : कंपनीने 4 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे.

निकालांनंतर सुरुवातीला शेअरमध्ये 3 ते 7 टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती, ज्याचे मुख्य कारण कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि जागतिक भू-राजकीय तणावामुळे भविष्यातील मार्जिनवर होणारा संभाव्य परिणाम हे असल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news