

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे २० नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. "महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे बुधवार, २० नोव्हेंबर रोजी व्यवहार (Stock Market Holiday) बंद राहतील," असे एनएसईने (NSE) जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
बीएसई देखील या दिवशी सुट्टीची घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही एक्सचेंज वेळ आणि सुट्ट्यांच्या बाबतीत एकत्रितपणे कार्य करतात. शनिवार आणि रविवारी एक्सचेंज बंद राहतील. १ नोव्हेंबरला दिवाळीसाठी शेअर बाजाराला सुट्टी होती. पण त्या दिवशी सायंकाळी १ तासाचे मुहूर्ताचे ट्रेडिंग झाले होते. गुरु नानक जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला बाजार बंद राहणार आहे. शेअर बाजाराची या महिन्यांतील ही तीसरी सुट्टी असेल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी १० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.