इराण- इस्रायल युद्धाचे पडसाद; सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, क्षणात उडाले ५.६२ लाख कोटी

Stock Market Updates | कोणते शेअर्स घसरले?
Stock Market Updates Sensex Nifty
सेन्सेक्स- निफ्टी गुरुवारी (दि.३) घसरले.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

इराण- इस्रायल यांच्यातील संघर्षाचे (Israel-Iran war) पडसाद आज गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स (Sensex) आज तब्बल १,२०० अंकांच्या घसरणीसह खुला झाला. सुरुवातीची सेन्सेक्सची घसरण १.५ टक्के एवढी होती. तर निफ्टी ३०० हून अधिक अंकांनी घसरून २५,५०० च्या खाली खुला झाला. त्यानंतर दोन्ही निर्देशांकात रिकव्हरी दिसून आली. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स ५९० अंकांच्या घसरणीसह ९८३,६६० वर व्यवहार करत होता. तर निफ्टी २५,६०० वर होता.

क्षणात उडाले ५.६२ लाख कोटी

इस्रायल- इराण यांच्यातील संघर्षादरम्यान अमेरिका आणि युरोपीय शेअर बाजार काही प्रमाणात सावरले आहेत. पण आशियाई बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. यामुळे आज बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात ५.६२ लाख कोटींची घट होऊन ते ४६९.२३ लाख कोटींवर आले.

Sensex Today : कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्स आज ८३,००२ वर खुला झाला. त्यानंतर त्यात रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, एम अँड एम, एशियन पेंट्स, मारुती, ॲक्सिस बँक, मारुती, रिलायन्स, एलटी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, टीसीएस हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले आहे. तर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, सन फार्मा हे शेअर्स हिरव्या रंगात खुले झाले आहेत.

सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक घसरले

सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक घसरले आहेत. फायनान्सियस सर्व्हिसेस, ऑटो, एनर्जी स्टॉक्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

भू-राजकीय तणावाचा शेअर बाजारात दबाव

संमिश्र जागतिक संकेत आणि मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाचा शेअर बाजारात दबाव दिसून येत आहे. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी ५० दोन्ही प्रत्येकी सुमारे १ टक्के घसरले. यामुळे शेअर बाजाराला मोठा फटका बसला.

crude oil prices : कच्च्या तेलाचे दर भडकले

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे तेल पुरवठ्यात अडथळा येऊ शकतो, या चिंतेमुळे तेलाच्या किमती भडकल्या आहेत. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ७५ डॉलरच्या पुढे गेला आहे. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट प्रति बॅरल ७२ डॉलरवर पोहोचले. दोन्ही बेंचमार्क गेल्या तीन दिवसांत जवळपास ५ टक्क्यांनी वाढले आहेत. भारत हा तेल आयातदार देश असल्याने मध्य पूर्वेतील तणावाचा फटका भारताला बसणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Stock Market Updates Sensex Nifty
इस्रायल- इराण संघर्षामुळे कच्चे तेल भडकले! भारतावर काय होणार परिणाम?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news