

Stock Market Updates
अमेरिका आणि आशियाई बाजारातील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि.२७ मे) घसरण झाली. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरून ८१,४०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०० हून अधिक अंकांनी घसरून २४,७८० वर व्यवहार करत आहे. मुख्यतः फायनान्सियल आणि आयटी शेअर्स विक्रीचा दबाव दिसून येत आहे.
क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी बँक, फायनान्सियल सर्व्हिसेस, आयटी, ऑटो, एफएमसीजी हे निर्देशाकं घसरले आहेत.
सेन्सेक्सवर सर्व ३० पैकी ३० शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. अल्ट्राटेक सिमेंट, इर्टनल, एनटीपीसी, एम अँड एम, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, रिलायन्स, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एलटी, बजाज फायनान्स हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले आहेत.
इंडिगो एअरलाईन्सची पेरेंट कंपनी इंटरग्लोब एव्हिएशचा शेअर्स आज सुरुवातीच्या व्यवहारात २.५ टक्के घसरला. या कंपनीचे सह-संस्थापक राकेश गंगवाल यांनी एका मोठ्या ब्लॉक डीलमध्ये त्यांचा सुमारे ५.८ टक्के हिस्सा विकल्याच्या वृत्तानुसार त्यांचे शेअर्स घसरले आहेत.