

Stock Market Updates
जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.१६ जुलै) घसरण झाली. सुरुवातीला सेन्सेक्स १५० अंकांनी घसरून ८२,५०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ५३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,१४० वर व्यवहार करत आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे आशियाई बाजारात घसरण दिसून आली. या पार्श्वभूमीवर भारतीय इक्विटी बेंचमार्कदेखील घसरणीसह खुल झाले आहेत.
सेक्टरलमध्ये निफ्टी ऑटो निर्देशांक ०.८ टक्के घसरला आहे. ऑटोमधील अशोक लेलँड, Motherson, हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरून टॉप लूजर्स ठरले आहेत.
सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, ट्रेंट हे शेअर्स ०.५ ते १ टक्के वाढले आहेत. तर दुसरीकडे टाटा स्टील, एम अँड एम, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, इर्टनल, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स घसरले आहेत.