Stock Market Updates | शेअर बाजारात चढ-उतार, मिड, SmallCapवर दबाव

जाणून घ्या आजचे मार्केट
Stock Market, sensex today
शुक्रवारी (दि.४) शेअर बाजारात चढ-उतार दिसून येत आहे. file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य पूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाचे वाढते दर आणि परदेशी गुंतवणुकीचा कमी झालेला ओघ आदींमुळे भारतीय शेअर बाजार (Stock Market Updates) शुक्रवारी (दि.४) घसरणीसह खुला झाला होता. पण त्यानंतर लगेच त्यात रिकव्हरी दिसून आली. आज शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरून ८२,०५१ पर्यंत खाली आला होता. त्यानंतर लगेच त्यात रिकव्हरी दिसून आली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ८२,४७० च्या वर व्यवहार करत होता. तर निफ्टी २५,२४५ च्या सपाट पातळीवर व्यवहार करत होता.

जागतिक कमकुवत संकेत

काल सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty50) प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरून बंद झाले होते. आज शुक्रवारी सलग पाचव्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह खुले. जागतिक कमकुवत संकेताचा भारतीय शेअर बाजाराला फटका बसत आहे. रिलायन्स, बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

मिडकॅप, स्मॉलकॅपवर दबाव

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपवर देखील दबाव दिसून येत आहे. सुरुवातीला दोन्ही निर्देशांक प्रत्येकी १ टक्के घसरले होते. त्यानंतर लगेच त्यात रिकव्हरी दिसून आली. दरम्यान, आयटी स्टॉक्स मजबूत स्थितीत आहेत.

Sensex Today : कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स हे शेअर्स घसरले आहेत. तर इंडसइंड बँक, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा हे शेअर्स हिरव्या रंगात खुले झाले आहेत.

Stock Market, sensex today
सेन्सेक्स- निफ्टी २-२ टक्क्यांनी घसरून बंद, गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news