Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, आयटी आणि मेटल शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Today: आज बाजाराने चांगली सुरुवात केली, परंतु काही मिनिटांतच इंडेक्स लाल रंगात घसरल्यामुळे अस्थिरता वाढली. आयटी आणि मेटल शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आज शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली, सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला. निफ्टी देखील हिरव्या रंगात होता. सकाळी 9:22 वाजता सेन्सेक्स 60 अंकांनी वाढून 84,451 वर पोहोचला. निफ्टी 28 अंकांनी वाढून 25,786 वर पोहोचला. आज आयटी आणि मेटल निर्देशांकांमध्ये खरेदी दिसून येत आहे.

जागतिक संकेतांमुळे सकारात्मक सुरुवात

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अपेक्षेनुसार 0.25% व्याजदर कपात जाहीर केली आणि तरलता वाढवण्यासाठी दरमहा 40 अब्ज डॉलरच्या सरकारी बाँड खरेदीची घोषणा केली. फेडने 2026 मध्ये फक्त एकदाच रेट कट होण्याची शक्यता आहे, असे सांगितल्यानंतर बाजारातील गुंतवणूकदार सावध झाले.

जागतिक बाजारात जोरदार तेजी

फेडच्या निर्णयानंतर अमेरिकन बाजार तेजीत:

  • Dow Jones: 500 अंकांनी वाढला, चार आठवड्यांच्या उच्चांकावर

  • Nasdaq: 75 अंकांनी वाढला, पाच आठवड्यांच्या उच्चांकावर

  • Russell 2000: सलग दुसऱ्या दिवशी लाइफ टाईम हाय गाठला

  • GIFT Nifty: 80 अंकांनी वाढून 25,950 वर होता

Stock Market Today
Influencer Market: 3,000 कोटी नाही… तब्बल 10,000 कोटी; इन्फ्लुएंसर इंडस्ट्रीचे आकडे पहिल्यांदाच समोर

आज बाजारासाठीचे मुख्य ट्रिगर्स

  • फेडची 0.25% रेट कटची घोषणा

  • चांदीने नवीन इतिहास रचला; सोन्यात किंचित घसरण

  • भारत–अमेरिका ट्रेड डीलबद्दल सकारात्मक संकेत

  • FII सतत विक्रेते; DIIs ची 73व्या दिवशी मोठी खरेदी

  • TCS ने Coastal Cloud चे अधिग्रहण केले

डॉलर इंडेक्स

अमेरिकेतील रेट कटचा परिणाम थेट डॉलर इंडेक्स आणि बाँड यील्डवर झाला:

  • डॉलर इंडेक्स 99च्या खाली, सहा आठवड्यांतला नीचांक

  • 10-वर्षांच्या ट्रेझरी यील्डमध्ये चार दिवसानंतर ब्रेक

Stock Market Today
Rhea Chakraborty: अभिनय सोडला… एक वर्षात उभी केली 40 कोटींची कंपनी; रिया चक्रवर्तीचे जबरदस्त कमबॅक

कमोडिटी मार्केटमध्ये हालचाल

  • चांदी: 1,91,800 रुपये, इतिहासातील सर्वात मोठी वाढ

  • आंतरराष्ट्रीय चांदी: 62 डॉलर

  • सोने: 300 रुपयांनी घसरून 1,29,700 रुपयांच्या खाली

  • क्रूड ऑइल: किंचित वाढ, 62 डॉलरवर ट्रेड

FII–DII डेटा

  • FIIs: सलग 10व्या दिवशी विक्री, ₹3,565 कोटींची सेलिंग

  • DIIs: ₹3,752 कोटींची खरेदी, सलग 73व्या दिवशी खरेदी

कॉर्पोरेट आणि सेक्टोरल अपडेट्स

  • SBI आणि Bank of Baroda ला डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म सुरू करण्यास RBIची मंजुरी. ऑनलाईन फ्रॉड शोधणे सोपे होणार.

  • TCS कंपनीने Coastal Cloud चे अधिग्रहण करून क्लाउड कन्सल्टिंग क्षमता वाढवली आहे.

भांडवली बाजार

  • Adani Enterprises चा 25,000 कोटींचा राइट्स इश्यू जवळपास भरला

  • Nephrocare IPO पहिल्या दिवशी 12% सब्सक्रिप्शन

  • Park Medi World IPO पहिल्या दिवशी 52% सब्सक्रिप्शन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news