Stock Market Today: शेअर बाजार पुन्हा तेजीत; सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स चमकले?

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले असून सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, तर निफ्टी २३,५०० च्या वर पोहोचला. Cipla, Bharti Airtel आणि Power Grid सारख्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि काही मोठ्या कंपन्यांच्या निकालांच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलेला दिसला. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये सुमारे ४०० अंकांची वाढ झाली, तर निफ्टी २३,५०० च्या वर व्यवहार करताना दिसला. याशिवाय बँक निफ्टीतही जवळपास ३०० अंकांची वाढ झाली.

आजच्या व्यवहारात फार्मा आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. विशेषतः Cipla, Bharti Airtel आणि Power Grid हे शेअर्स टॉप गेनर्समध्ये होते. बाजाराचा मूड जवळपास ७९ टक्के तेजीत असल्याचे सांगितले जात आहे.

जागतिक पातळीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमध्ये सुरू होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. व्यापार करार, तंत्रज्ञान हस्तांतरण, निर्यात नियंत्रण, तैवान आणि इराण यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेचा परिणाम जागतिक बाजारांवर होऊ शकतो.

जागतिक संकेतही बाजारासाठी सकारात्मक राहिले. GIFT Nifty सुमारे ८० अंकांच्या वाढीसह २३,५४० च्या आसपास व्यवहार करत होता. तर अमेरिकेतील Dow Futures मध्येही सुमारे १०० अंकांची तेजी दिसून आली. त्यामुळे भारतीय बाजारात सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती.

अमेरिकन बाजारातही तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सच्या जोरावर मोठी तेजी पाहायला मिळाली. Nasdaq ने नवा उच्चांक गाठत सुमारे ३०० अंकांची वाढ घेतली, तर S&P 500 नेही नवीन लाइफटाइम हाय गाठला. मात्र Dow Jones मध्ये दिवसाअखेरीस किरकोळ घसरण नोंदवली गेली.

दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये थोडा दिलासा मिळाला आहे. ब्रेंट क्रूड जवळपास २ टक्क्यांनी घसरून १०६ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास स्थिरावला. मात्र पश्चिम आशियातील तणाव आणि इराणशी संबंधित भू-राजकीय धोके अजूनही कायम असल्याने गुंतवणूकदार सावध आहेत.

Stock Market Today
Meta Layoffs: मार्क झुकरबर्गचा मोठा निर्णय; ८,००० कर्मचाऱ्यांची करणार कपात, कारण वाचून थक्क व्हाल

कमोडिटी मार्केटमध्ये बेस मेटल्समध्येही जोरदार तेजी दिसून आली. कॉपरमध्ये जवळपास १ टक्का आणि अॅल्युमिनियममध्ये २.५ टक्क्यांची वाढ झाली. याचा परिणाम Tata Steel, Hindalco, Vedanta आणि SAIL सारख्या मेटल कंपन्यांच्या शेअर्सवर दिसू शकतो.

दुसरीकडे, सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्क वाढवल्यानंतर त्यांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली. चांदीच्या किंमतींमध्ये तब्बल ₹२१,२०० ची वाढ होऊन ती ₹३ लाख प्रति किलोच्या वर गेली. तर सोन्याच्या किंमती सुमारे ₹८,७०० ने वाढून ₹१.६२ लाख प्रति १० ग्रॅमच्या आसपास पोहोचल्या.

Stock Market Today
EPFO Update: तुमचं काम फटाफट पूर्ण होणार... ७ कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी; EPFO मोठा बदल करण्याच्या तयारीत

परदेशी गुंतवणूकदारांची विक्री मात्र सुरूच आहे. FIIs ने सलग सातव्या दिवशी सुमारे ₹४,७०० कोटींची विक्री केली. मात्र याच वेळी DIIs म्हणजे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सलग १४व्या दिवशी खरेदी सुरू ठेवत सुमारे ₹५,८७० कोटींची गुंतवणूक केली. त्यामुळे बाजाराला आधार मिळाल्याचे दिसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news