Stock Market Today: शेअर बाजार पुन्हा लाल रंगात; निफ्टी 23,700 च्या खाली, गुंतवणूकदारांनी काय करावं?

Stock Market Today: शेअर बाजारातील घसरणीचे सत्र कायम असून, निफ्टी 23,700 च्या खाली घसरल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: शेअर बाजारातील घसरणीचा सिलसिला आजही कायम राहिला आहे. आठवड्याच्या एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवातच घसरणीसह झाली. निफ्टी 36 अंकांच्या घसरणीसह 23,743 अंकांवर, तर सेन्सेक्स 163 अंकांनी घसरून 75,970 अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात विक्रीचा दबाव आणखी वाढला आणि निफ्टी 23,700 च्या खाली घसरला.

तांत्रिकदृष्ट्या 23,700 ही निफ्टीसाठी महत्त्वाची पातळी मानली जात आहे. त्यामुळे आज बाजाराची क्लोजिंग कोणत्या पातळीवर होते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

बाजारावर दबाव का?

सध्या देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवरील अनेक घडामोडींचा दबाव शेअर बाजारावर दिसत आहे. अमेरिका-इराणमधील तणाव वाढत असून, स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने महागाई आणि व्याजदरांबाबतची चिंता आणखी तीव्र झाली आहे. याशिवाय, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) पुन्हा विक्री सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

निफ्टी 23,600 पर्यंत घसरण्याची शक्यता

HDFC Securitiesचे प्राइम रिसर्च प्रमुख देवर्ष वकील यांच्या मते, महागाई आणि व्याजदरांच्या दृष्टिकोनाबाबतची चिंता सध्या बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकन बाजारात लार्ज-कॅप टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत असली, तरी बॉन्ड यील्डमधील अस्थिरतेचा परिणाम जागतिक बाजारांवर होत आहे.

निफ्टी सध्या महत्त्वाच्या तांत्रिक मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली व्यवहार करत आहे. काल निफ्टीने 23,786 चा स्विंग लो तोडला, त्यामुळे आता 23,600 पर्यंत घसरणीचा मार्ग खुला झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे, बाजारात रिकव्हरी झाल्यास 24,000 ही पहिली महत्त्वाची अडथळ्याची पातळी ठरू शकते.

आज बाजारासाठी नकारात्मक संकेत कोणते?

  • कच्च्या तेलाची किंमत 97 डॉलरच्या वर गेली आहे.

  • FIIsची खरेदी थांबून विक्रीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.

  • अमेरिकन बाजारांमध्ये घसरणीचे वातावरण आहे.

  • IPOची मोठी संख्या बाजारातील लिक्विडिटीवर दबाव आणू शकते.

बाजारासाठी काही सकारात्मक संकेतही

घसरणीच्या वातावरणात काही सकारात्मक बाबीही आहेत. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DIIs) सातत्याने खरेदी करत आहेत. तसेच, युद्ध संपल्यास कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

याशिवाय, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये अद्याप मोठ्या प्रमाणावर घसरणी दिसत नाही. भारताची आर्थिक आकडेवारीही मजबूत आहे. Put-Call Ratio (PCR) 0.69 वर पोहोचला असून, बाजार ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ असल्याचे संकेत मिळत आहेत.

लार्जकॅप शेअर्समध्ये विक्री का?

जियोजीत इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे रिसर्च प्रमुख विनोद नायर यांच्या मते, स्ट्रेट ऑफ होर्मुजसंदर्भातील ताज्या घडामोडींचा परिणाम लार्जकॅप शेअर्स आणि एकूण बाजारावर झाला आहे.

याउलट, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये तुलनेने चांगली कामगिरी दिसत आहे. कंपन्यांच्या कमाईत होत असलेल्या सुधारणेचा फायदा या शेअर्सना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, एकूण बाजाराचा मूड सध्या घसरलेला आहे.

Stock Market Today
Gold Price Today: सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा; सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, काय आहे आजचा भाव?

निफ्टीसाठी पुढील महत्त्वाच्या पातळी कोणत्या?

SAMCO Securitiesचे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट ओम मेहरा यांच्या मते, निफ्टीचा तांत्रिक सेटअप सध्या घसरलेला आहे. RSI 34 वर आला आहे, म्हणजेच बाजार ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ पोहोचला आहे.

निफ्टीसाठी सध्या 23,700 आणि त्यानंतर 23,600 हे महत्त्वाचे सपोर्ट लेव्हल्स आहेत. बाजारात पुन्हा तेजीचा विश्वास निर्माण होण्यासाठी निफ्टीने 24,000चा स्तर पार करणे आवश्यक आहे. त्यानंतर 24,200 ही पुढील महत्त्वाची अडथळ्याची पातळी ठरू शकते.

Stock Market Today
Gen z fake Wedding Trends: दारात मांडव, लगीनघाई अन् पंगती... पण नवरा-नवरीच नाही! 'जेन-झी'मध्ये का वाढतोय 'फेक वेडिंग'चा ट्रेंड

गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावे?

एकीकडे कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिका-इराण तणाव आणि FIIsची विक्री बाजारावर दबाव आणत आहे, तर दुसरीकडे DIIsची खरेदी, मजबूत भारतीय आर्थिक आकडेवारी आणि ओव्हरसोल्ड स्थिती बाजाराला आधार देत आहे. त्यामुळे 23,600-23,700 हा झोन आज बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news