Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेंसेक्स-निफ्टी तेजीत, गुंतवणूकदारांना 1.4 लाख कोटींचा फायदा

Stock Market Today: आज शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली असून निफ्टी 83 अंकांनी तर सेन्सेक्स 245 अंकांनी वधारला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजार उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली असून, सुरुवातीच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.4 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

आज निफ्टी 83 अंकांच्या वाढीसह 23,201 वर, तर सेन्सेक्स 245 अंकांच्या वाढीसह 74,249 वर उघडला. सकारात्मक सुरुवातीमुळे BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून सुमारे 473.8 लाख कोटी रुपये झाले.

मात्र, बाजारातील ही सुरुवातीची तेजी किती काळ टिकते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. कारण जागतिक बाजारातील दबाव, कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकेतील व्याजदराचा निर्णय आणि अमेरिका-इराण तणाव यांसारखे अनेक घटक सध्या बाजारावर परिणाम करत आहेत.

कालच्या घसरणीनंतर आज बाजारात तेजी

बुधवारी बाजाराने सकारात्मक सुरुवात केली असली तरी, त्याआधीच्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. विकली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी तब्बल 280 अंकांनी घसरून 23,188 वर बंद झाला होता. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 9 लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली होती.

त्यामुळे आजची सुरुवात गुंतवणूकदारांसाठी काहीसा दिलासा देणारी ठरली आहे. मात्र, बाजारातील अस्थिरता कायम असल्याने केवळ सुरुवातीच्या तेजीवरून पुढील दिशा निश्चित करता येणार नाही.

शेअर बाजारावर दबाव कायम

भारतीय शेअर बाजारावर सध्या अनेक जागतिक घटकांचा दबाव आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजीमुळे भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर अमेरिकेतील व्याजदरांबाबतचा निर्णयही महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात दबाव निर्माण झाला आहे. याशिवाय अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.

या सर्व घटकांचा परिणाम आगामी काळात भारतीय शेअर बाजाराच्या हालचालींवर होऊ शकतो.

निफ्टी उच्चांकापासून 12.5 टक्के खाली

कालच्या घसरणीनंतर निफ्टी आपल्या उच्चांकाच्या तुलनेत सुमारे 12.5 टक्क्यांनी खाली आला आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढीच्या अपेक्षांमुळे अमेरिकन शेअर बाजारातही दबाव कायम आहे. दुसरीकडे, आशियाई बाजारांमध्ये काही प्रमाणात सकारात्मक वातावरण दिसून आले. दक्षिण कोरियाच्या बाजारात सुमारे पाऊण टक्क्यांची, तर जपानच्या बाजारात सुमारे अर्ध्या टक्क्याची तेजी दिसली.

बाजारासाठी कोणते घटक नकारात्मक?

सध्याच्या परिस्थितीत भारतीय बाजारासमोर अनेक आव्हाने आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी, अमेरिकन बाजारातील घसरण आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री यामुळे बाजाराच्या सेंटिमेंटवर परिणाम होत आहे.

याशिवाय रुपया मागील तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला आहे. VIX मध्ये सलग दोन दिवस झालेली वाढ बाजारातील अस्थिरता वाढल्याचे संकेत देत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळेही बाजारातील एकूण सेंटिमेंट कमकुवत झाले आहेत.

अमेरिकेतील व्याजदराचा निर्णय महत्त्वाचा

आज अमेरिकेतील केंद्रीय बँकेच्या व्याजदराच्या निर्णयाकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष आहे. व्याजदरात वाढ झाल्यास त्याचा परिणाम जागतिक शेअर बाजारांवर होण्याची शक्यता आहे.

व्याजदर वाढल्यास बाँड्सवरील परतावा आकर्षक होऊ शकतो आणि त्याचा परिणाम जोखमीच्या मालमत्तांवरील गुंतवणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेतील निर्णय भारतीय बाजारासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे.

Stock Market Today
UPI MDR Charge: चहा, भाजीपाला, विजेची बिले, पेट्रोल, विमा, तिकीट, खरेदी... कुठे आणि किती पैसे कापले जाणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

टेक्निकल चार्ट काय सांगतो?

HDFC Securities चे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नागराज शेट्टी यांच्या मते, मध्यपूर्वेतील संकट, कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे.

टेक्निकल चार्टवर निफ्टीने लाँग बेअर कँडल तयार केली आहे. या कँडलचा आकार सुमारे 474 अंकांचा असून, त्याचा उच्चांक 23,592 आणि नीचांक 23,118 असा होता. या टेक्निकल सेट-अपने बाजारात आणखी घसरणीची शक्यता वर्तवली आहे.

Stock Market Today
Manoj Jarange Patil: बीडच्या पाटोद्यात रात्री २ वाजता मनोज जरांगेंची सभा; ‘माझ्या मागे येऊ नका, नाहीतर...’, आंदोलकांना दिला इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news