Stock Market Today: सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 239 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटींचे नुकसान

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने सलग चौथ्या दिवशी घसरणीसह सुरुवात करत निफ्टी 23,904 आणि सेन्सेक्स 76,515 वर उघडला.
Stock Market Crash
Stock Market CrashPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात आजही घसरण कायम आहे. सलग चौथ्या दिवशी बाजाराने नकारात्मक सुरुवात केली. सेन्सेक्स 239 अंकांनी घसरून 76,515 वर, तर निफ्टी 91 अंकांच्या घसरणीसह 23,904 वर उघडला.

या घसरणीमुळे BSE वर लिस्टेड कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यात (Market Cap) तब्बल 2.3 लाख कोटींची घट झाली असून ते 477.76 लाख कोटींवर आले आहे.

बुधवारी निफ्टी तब्बल 191 अंकांनी घसरून 23,996 वर बंद झाला होता. त्यामुळे बाजारातील नकारात्मक वातावरण आजही कायम असल्याचे चित्र आहे.

बाजारातील नकारात्मक घटक

सध्या देशांतर्गत शेअर बाजारावर अनेक नकारात्मक घटकांचा एकत्रित परिणाम होत आहे. अमेरिका-इराणमधील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमती 96 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे जाणे, रुपयाची सातत्याने घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमकुवत झाला आहे.

तांत्रिक विश्लेषणानुसार निफ्टी 24,000 च्या महत्त्वाच्या पातळीखाली घसरल्याने पुढील काळातही अस्थिरता आणि घसरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जागतिक बाजार सकारात्मक, तरी भारतावर दबाव

आशियातील प्रमुख बाजारांकडे पाहिले तर जपानचा निक्केई निर्देशांक सुमारे 0.5 टक्क्यांनी, तर दक्षिण कोरियाचा KOSPI सुमारे 2.5 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे जागतिक बाजार पूर्णपणे कमकुवत नसतानाही भारतातील घसरणीमागे प्रामुख्याने भू-राजकीय तणाव आणि वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती कारणीभूत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

FII आणि DII दोघांचीही विक्री

बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) रोख बाजारात 819 कोटींची विक्री केली. रोख बाजार, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून त्यांची एकूण निव्वळ विक्री 5,406 कोटींवर पोहोचली.

दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) देखील 418 कोटींची विक्री केली. विशेष म्हणजे, 22 एप्रिलनंतर प्रथमच FII आणि DII या दोन्ही गटांनी एकाच दिवशी रोख बाजारात विक्री केली, ही बाब बाजारासाठी चिंतेची मानली जात आहे.

आज बाजारासाठी प्रमुख नकारात्मक संकेत

  • कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ.

  • अमेरिका-इराण संघर्ष कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

  • रुपया पुन्हा विक्रमी नीचांकी पातळीच्या जवळ.

  • FII आणि DII या दोघांकडूनही विक्रीचा दबाव.

  • बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सवर दबाव कायम.

  • मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री.

Stock Market Crash
Sonia Sehrawat: 'कॉकरोच कधीच मरत नाहीत...' RAF अधिकारी सोनिया सेहरावत कोण? त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे उडाली खळबळ

सकारात्मक बाबी कोणत्या?

नकारात्मक वातावरण असले तरी काही सकारात्मक संकेतही आहेत. भारताव्यतिरिक्त बहुतांश जागतिक बाजार स्थिर किंवा सकारात्मक आहेत. तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री सुरू असली तरी ती अद्याप मोठ्या प्रमाणावर वाढलेली नाही. याशिवाय निफ्टीला 23,800, तर बँक निफ्टीला 56,500 या पातळीवर महत्त्वाचा तांत्रिक आधार मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तज्ज्ञांचे मत

SAMCO Securities चे तांत्रिक संशोधन विश्लेषक ओम मेहरा यांच्या मते, सध्या बाजारात सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. आगामी व्यवहारांमध्ये अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते निफ्टीसाठी 23,800 हा महत्त्वाचा सपोर्ट लेव्हल असून, बाजारात सुधारणा झाल्यास 24,150 हा पहिला, तर 24,220 हा दुसरा महत्त्वाचा रेसिस्टन्स ठरू शकतो.

Stock Market Crash
Sonam Wangchuk hunger strike : "... तर उपोषण मागे घेईन" ; सोनम वांगचुक यांचे केंद्र सरकारला पत्र

गुंतवणूकदारांनी सध्या घाईघाईने निर्णय न घेता जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाची स्थिती आणि परदेशी गुंतवणूकदारांचा कल यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news