Stock Market Today: शेअर बाजारात दमदार वाढ; निफ्टी 24,150 च्या वर, IT शेअर्सची जोरदार मुसंडी; गुंतवणूकदारांची मोठी कमाई

Stock Market Today: आयटी शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे भारतीय शेअर बाजारात आज दमदार तेजी पाहायला मिळाली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली. जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि आयटी कंपन्यांच्या मजबूत कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. सकाळच्या सत्रात निफ्टी 24,150 च्या पुढे, तर सेन्सेक्स 77,300 च्या वर व्यवहार करत होता. गुरुवारी झालेल्या रिकव्हरीनंतर आज बाजारात खरेदीचा जोर कायम राहिल्याचे चित्र दिसून आले.

बाजाराची दमदार सुरुवात

शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 161 अंकांच्या वाढीसह 24,124 वर उघडला, तर सेन्सेक्स 653 अंकांनी वाढून 77,395 वर सुरू झाला. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने निफ्टीने 24,150 चा टप्पाही ओलांडला.

IT शेअर्स ठरले आजचे स्टार

आजच्या व्यवहारात आयटी क्षेत्राने सर्वाधिक चमक दाखवली. Nifty IT निर्देशांकात सुमारे 2.5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. TCS, इन्फोसिस, HCL Tech, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेंट्स या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. यातील अनेक शेअर्समध्ये अडीच टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

30 पैकी 28 शेअर्स तेजीत

सेन्सेक्समधील 30 प्रमुख शेअर्सपैकी 28 शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. सन फार्मा आणि भारती एअरटेल हे दोनच शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

Stock Market Today
Dev Khel Controversy: प्राजक्ता माळीच्या 'देव खेळ'वरून विधानसभेत खळबळ; आशिष शेलारांचा कारवाईचा इशारा; नेमका वाद काय?

बाजाराला आधार देणारे प्रमुख घटक

शेअर बाजारातील तेजीमागे अनेक सकारात्मक कारणे असल्याचे विश्लेषक सांगतात.

  • GIFT Nifty मध्ये मजबूत वाढ

  • अमेरिकन बाजारातील सकारात्मक वातावरण

  • जपानच्या निक्केई आणि दक्षिण कोरियाच्या कोस्पी निर्देशांकात जोरदार तेजी

  • कच्च्या तेलाच्या किमती 76 डॉलरच्या आसपास स्थिर

  • रुपयात सुधारणा

  • TCS चे समाधानकारक तिमाही निकाल

  • मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढलेली खरेदी

FII आणि DII ची भूमिका

गेल्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) सुमारे ₹532 कोटींची विक्री केली. मात्र देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ₹2,057 कोटींची खरेदी करून बाजाराला आधार दिला.

गुंतवणूकदारांसाठी अजूनही सावधगिरीचा सल्ला

बाजारात तेजी असली तरी विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. वरच्या पातळीवर नफा वसुली (Profit Booking) होण्याची शक्यता कायम आहे.

तज्ज्ञांच्या मते, निफ्टी 23,800 च्या वर टिकून राहिला तर तेजी कायम राहू शकते. मात्र 24,200 हा महत्त्वाचा प्रतिकार (Resistance) स्तर मानला जात आहे.

निफ्टीसाठी महत्त्वाचे स्तर

  • महत्त्वाचा सपोर्ट: 23,800 आणि 23,650

  • सुपरट्रेंड सपोर्ट: 23,770

  • प्रमुख रेसिस्टन्स: 24,150 ते 24,200

सध्या भारतीय शेअर बाजारात खरेदीचा कल दिसत असला तरी जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका यावर पुढील दिशा अवलंबून असेल. त्यामुळे गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news