Stock Market Today : घसरणीनंतर बाजार सावरला, काेणत्‍या शेअर्संनी अनुभवली तेजी?

निप्‍टीत १०० अंकांनी वाढ, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही हिरव्या चिन्हात
Stock Market Today
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
Updated on

देशांतर्गत शेअर बाजार आज (दि.१८) सुरुवातीच्‍या घसरणीनंतर सावरला. महत्त्वाच्या शेअर बाजार निर्देशांकांनी वधारत हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार सावध पवित्रा घेतना दिसले. एस अ‍ॅण्ड पी बीएसई सेन्सेक्सने सकाळी ९:२८ वाजेपर्यंत ११८.३७ अकांनी वाढ नोंदवून ८१,७०१.६७ वर व्यवहार केला, तर एनएसई निफ्टी५० मध्ये ६१.६५ अकांनी वाढून २४,९१३.४५ वर पोहोचला.

वाहन क्षेत्रातील शेअर्स ‘टॉप गिअर’मध्ये

प्रारंभीच्या कमजोरीनंतर देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार पुनरुज्जीवन पाहायला मिळाले. निफ्टी सुमारे १०० अंशांनी उसळत २४,९०० च्या वर पोहोचला. महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी नोंदवली गेली. बँक निफ्टीतही लक्षणीय वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही हिरव्या चिन्हात व्यवहार करताना दिसले. आजच्या व्यवहारात वाहन क्षेत्रातील शेअर्स ‘टॉप गिअर’मध्ये असल्याचे दिसून आले. ऑटो इंडेक्स सुमारे १.५ टक्क्यांनी वधारला. मारुती सुझुकी, आयशर मोटर्स आणि टीव्हीएस मोटरचे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी वाढले.याशिवाय, रिअल इस्टेट, फार्मा आणि संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून गुंतवणूकदारांचा कल या क्षेत्रांकडे वळलेला दिसून येतो.

Stock Market Today
वेध शेअर बाजाराचा : मोठी झेप घेण्याच्या पवित्र्यात भारतीय बाजार ?

सुरुवातीच्‍या व्‍यवहारात घसरण

पश्‍चिम आशियातील तणावांचा बाजारावर परिणाम पश्‍चिम आशियातील इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला सहा दिवस पूर्ण होत असतानाच भारतीय शेअर बाजारात बुधवारी सकाळच्या सत्राची सुरुवात घसरणीसह झाली. या तणावामुळे गुंतवणूकदारांचा कल सावध राहिला.एनएसई निफ्टी ५० निर्देशांकात सत्राच्या सुरुवातीला ५८ अंशांची (०.२३%) घसरण नोंदली गेली असून तो २४,७९५ वर उघडला. बीएसई सेन्सेक्स २४० अंशांनी (०.२९%) खाली येत ८१,३४४ वर उघडला.संपूर्ण बाजाराच्या प्रवाहानुसार बँक निफ्टीतही १२० अंशांची (०.२१%) घसरण होऊन तो ५५,५९५ वर उघडला. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक १५४ अंशांनी (०.२६%) घसरून ५८,२२५ वर स्थिरावला.

Stock Market Today
वेध शेअर बाजाराचा | जीडीपीची कमाल, बाजारात धमाल

'हे' शेअर्स राहिले आघाडीवर

निफ्टी ५० मध्ये इंडसइंड बँक, ओएनजीसी, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, ट्रेंट आणि श्रीराम फायनान्स हे समभाग सर्वाधिक वाढले. सुरुवातीच्या व्यवहारात महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हे प्रमुख बाजारचालक ठरले. तर कोटक महिंद्रा बँक, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील आणि एचडीएफसी बँक हे समभाग सुरुवातीच्या व्यवहारात दबावाखाली होते.

image-fallback
अर्थभान : डेट म्युच्युअल फंडचे फायदे

इस्रायल-इराण संघर्षाची पार्श्वभूमी

इस्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्षाला सहा दिवस पूर्ण होत असून, शांततेच्या आंतरराष्ट्रीय आवाहनांनंतरही दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अटीविना शरण येण्याचे आवाहन केले असून, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे ठिकाण माहित असल्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की त्यांना आघात पोहोचवण्याचा अमेरिकेचा तातडीचा इरादा नाही. ट्रम्प यांनी इराणने नागरिक वा अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करू नये, अन्यथा संयम संपेल, असा इशाराही दिला आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम बाजाराच्या सुरुवातीच्‍या व्‍यवहारात दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news