

Stock Market |
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.
एक टक्क्यांची वाढ दर्शवत निफ्टीने सप्ताहात हिरवा झेंडा फडकत ठेवला. डिफेन्स कंपन्या, ऑईल अँड गॅस, रिअॅल्टी आणि ऑटो शेअर्सनी ही तेजी घडवून आणली. पारस डिफेन्स (CMP Rs. 1347.80) २९ टक्के वाढल्यामुळे आणि त्याला माझगाव डॉकयार्ड (Rs. 3004.70) सव्वाअकरा टक्के वाढ, गार्डन रिच (Rs. 1879.60) साडेतेरा टक्के वाढ यांनी साथ दिली.
क्रूड ऑईलचे दर एप्रिल २०२१ पासूनच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. सोन्याचा भाव सप्ताहात दोन टक्के कमी झाला. या दोन्ही बातम्या तेजीला पूरक आहेत. आय.टी., एनर्जी, फार्मा शेअर्सही तेजीच्या दिंडीत सामील झाले. मात्र, मेटल, एफएमसीजी, कंझ्यूमर ज्युरेबल्स शेअर्स घसरले.
सोनाटा सॉफ्टवेअर, एव्हरेस्ट ऑरगॅनिक्स, सीएलएन एनर्जी हे शेअर्स सप्ताहात चमकून उठले. व्हर्लपूल, अतुल ऑटो, सीएट हे शेअर्सदेखील चांगले वधारले. मात्र, खराब निकालांमुळे तेजस नेटवर्क्स आणि एसडब्ल्यू सोलारे हे शेअर्स गडगडले.
दमदार निकालांमुळे विशाल मेगा मार्ट आणि कोरो मंडल इंटरनॅशनल या शेअर्सनी सप्ताहात धमाल आणली. विशाल मेगामार्टचा निव्वळ नफा ८८ टक्के वाढला तर कोरोमंडलचा ८९ टक्के! मुरुगप्पा ग्रुपची कंपनी कोरोमंडल इंटरनॅशनल ही एका वर्षात दुप्पट झाली आहे. २ मे २०२४ रोजी हिच्या शेअरचा भाव होता रु. ११९६.५५.
एनबीसीसी ही सरकारी कन्स्ट्रक्शन कंपनी भारत सरकारकडे तिचे ६१.७५ टक्के शेअर्स आहेत. एलआयसीकडे ५.११ टक्के शेअर्स आहेत. कंपनीने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल प्रसिद्ध केले. सेल्स ग्रोथ १६.६ टक्के तर प्रॉफिट ग्रोथ २५.४ टक्के आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कंपनीची बुक ऑर्डर रु. एक लाख कोटी इतकी प्रचंड आहे.
'स्टॅटिस्टा' या कंपनीच्या रिपोर्टनुसार, जगातील सर्वात मोठ्या दहा बँकांची यादी (मार्केट कॅपनुसार) नुकतीच प्रसिद्ध झाली. अमेरिकेची J.P. Morgan Chase ही जगातील क्रमांक एकची बँक आहे. (मार्केट कॅप ६८६.१३ बिलीयन यूएस डॉलर्स) या यादीत अमेरिकेतील चार बँका आहेत. चीनमधील चार बँका आहेत. एक इंग्लंडची आहे, तर एक आहे आपली एचडीएफसी बैंक, या बँकेची HDFC शी विलीनीकरण झाल्यामुळे तिचे मार्केट कॅप वाढून ती जगातील सर्वात मोठ्या बँकांच्या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आली. वैशिष्ट्य म्हणजे नवव्या क्रमांकावर असणाऱ्या मॉर्गन स्टॅन्लीला ती कधीही मागे टाकू शकेल, अशी परिस्थिती आहे.
Railtel या भारत सरकारच्या नवरत्न कंपनीने बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले निकाल दिले. YOY बेसिसवर नेट प्रॉफीटमध्ये ४६.३ टक्के वाढ तर रेव्हेन्युमध्ये ५७ टक्के वाढ. भारत सरकारच्या रेल्वे आधुनिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये रेलटेलचे योगदान अनन्यसाधारण आहे. शुक्रवारचा शेअरचा भाव आहे रु. ३१८.५० आणि वर्षातील उच्चांक आहे रु. ६१७.८०. कंपनीची बुक ऑर्डर आणि शासनाचे पाठबळ पाहता हा शेअर आपली पूर्वीची उंची लवकरच गाठेल, असे वाटते.
Macrotech Developers आणि Persistent Systems हे दोन शेअर्स मागील एका महिन्यापासून गती पकडून आहेत. मॅक्रोटेक ही रिअल इस्टेटमधील कंपनी तर पर्सिस्टंट आयटी कंपनी. मॅक्रोटेक गेल्या महिन्यात १० टक्के वाढला (Rs. 1340) तर पर्सिस्टंट १३ टक्के वाढला. (Rs. 5420) हे दोन्ही शेअर्स नजीकच्या काळात भरघोस नफा मिळवून देतील असे वाटते.
शेअर बाजारात भविष्यातील घटनांचे प्रतिबिंब खूप अगोदर पडत असते. ज्यांच्याजवळ भविष्यातील घटनांची नोंद घेण्याची आणि त्यानुसार निर्णय घेण्याची गुंतवणूक करण्याची दूरदृष्टी असते. त्यांना शेअर बाजारात चांगला लाभ होतो. एक सेक्टर असे आहे, ज्याने अमेरिकेत आपला प्रभाव प्रस्थापित केला आहे आणि लवकरच ते आशियाई देशांमध्ये आणि विशेषतः भारतामध्ये आपला अंमल गाजविण्यास सिद्ध झाले आहे. हे सेक्टर आहे Data Center Sector आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि Data Center हे दोन आगामी काळात परवलीचे शब्द बनणार आहेत. आज Amazon Web Services ही जगातील सर्वात मोठी डेटा सेंटर कंपनी आहे. भारतातही अदानी आणि Gio या कंपन्या खूप मोठी डेटा सेंटर्स उभारत आहेत. कारण आज ९०० मेगावॅटची असणारी ही इंडस्ट्री आगामी तीन वर्षांत २००० मेगावॅटची होईल. अशा परिस्थितीत तीन कंपन्यांमध्ये आतापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात करा.
1) E2E Cloud CMP Rs. 2535.60
2) Netweb Technologies CMP Rs. 1420.00
3) Black Box CMP Rs. 371.50 एका सरकारी कंपनीने मेलने बऱ्याच समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच कंपनीने आपले निकाल सादर केले. २७ टक्के प्रॉफिट ग्रोथ कंपनीने दर्शवली आहे. शुक्रवारच्या शेअरचा भाव रु. ३३६ आहे. शेअरचा चार्ट पाहता अगदी नजीकच्या काळात हा शेअर ब्रेकआऊट देण्याच्या तयारीत आहे.
काही फंडामेंटली स्ट्रॉग कंपन्यांचे शेअर्स बाजाराच्या गतीबरोबर किंवा काही नैमित्तीक कारणांनी घसरणीला लागतात. परंतु, 52 Week Law ही एक अशी आधारपातळी आहे, जिथून बरेच शेअर्स उसळी घेतात. अशापैकी खालील शेअर्सवर आपले लक्ष असू द्या.
1) Piccadily Agro Rs. 532.05
2) AIA Engineering Rs. 3104.40
3) Praj Industries Rs. 451.95
4) Mayur Uniquoters Rs. 450.45
5) Ramkrishna Forgings Rs. 597.50
6) Hatsun Agro Rs. 898.65
निफ्टीचे गेल्या दोन आठवड्यांतील Consolidation आणि FPIS ची वाढती खरेदी पाहता निफ्टी मोठा ब्रेकआऊट देण्याच्या तयारीत आहे असे वाटते. मे महिन्यामध्येच निफ्टीने २५००० चा आकडा गाठला तर आश्चर्य वाटायला नको.
* एक टक्क्याच्या वाढीसह डिफेन्स, ऑईल अॅण्ड गॅस, रिअॅल्टी व ऑटो शेअर्सनी निफ्टी तेजीत.
* स्टॅटिस्टाच्या रिपोर्टनुसार, जगातील सर्वात मोठ्या दहा बँकांच्या यादीत एचडीएफसी बँकेचा समावेश.
* डेटा सेंटर आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेक्टरची आगामी काळात चलती.
* निफ्टी मोठा ब्रेकआऊट देण्याच्या तयारीत.