Share Marke
Share MarkePudhari

Share Market Closing bell | रिझर्व्ह बँकेच्या बुस्टरमुळे शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 747 अंकांनी वधारला; निफ्टी 25000 च्या पुढे...

Share Market Closing bell | बँकिंग, फायनान्स, ऑटो, मेटल शेअर्स तेजीत
Published on

Share Market Closing bell 6th June 2025

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने (एमपीसीने ) 6 जून रोजीच्‍या धोरण आढाव्यात रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सने तर सीआरआर 100 बेसिस पाईंट्सने कमी केले. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. या घोषणेचा सकारात्‍मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसला.

सेन्सेक्समध्ये 746.95 अंकांची वाढ होऊन तो 82188.99 वर बंद झाला. तर निफ्टीने 25000 चा टप्पा ओलांडला. निफ्टी निर्देशांकामध्ये 252.15 अंकांची वाढ होऊन तो 25003.05 वर बंद झाला. निफ्टीमधील ही वाढ 1.02 टक्के तर सेन्सेक्समधील वाढ 0.92 टक्के इतकी आहे.

मार्केटची सुरुवात लाल रंगाने

निफ्टी बँक 817.55 अंकांनी वाढीसह (1.47 टक्के) 56578 वर क्लोज झाला. तर निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात 707.30 अंकांनी वाढ होऊन तो 59010.30 वर बंद झाला.

चलन बाजारात भारतीय रूपयाचा अमेरिकन डॉलरशी विनियम दर 85.63 इतका होता. 16 पैशांनी त्यात वाढ नोंदवली गेली. गुरूवारी रूपयाचा डॉलरच्या तुलनेत दर 85.79 होता.

शुक्रवारी 6 जून रोजी शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगाने झाली. बेंचमार्क निर्देशांक किंचित घसरणीसह लाल रंगात घसरले होते. सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी यांनी घसरगुंडी अनुभवली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स तेजीत होते. त्यानंतर आरबीआयच्या पत्रकार परिषदेला सुरवात झाली.

Share Marke
Repo Rate : कर्ज होणार स्वस्त; RBI कडून रेपो दरात कपात

बँकिंग, फायनान्स, ऑटो, मेटल शेअर्सच्या किंमतीत वाढ

आजच्या व्यवहारात प्रमुख बँकिंग, फायनान्स, ऑटो आणि मेटल क्षेत्रातील शेअर्सने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण केले. श्रीराम फायनान्सचा शेअर 5.46 टक्क्यांनी बजाज फायनान्सचा शेअर 4.90 टक्क्यांनी वधारला. त्याचप्रमाणे JSW स्टीलच्या शेअरमध्ये 3.56 टकक्यांची वाढ झाली.

टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स

निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, ॲक्सिस बँक, मारुती सुझुकी यांचा समावेश होता.

तर टॉप लूजर्समध्ये एचडीएफसी लाईफ, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील, भारती एअरटेल, सन फार्मा या स्टॉक्सचा समावेश होता.

जागतिक बाजारपेठांमध्ये संमिश्र चित्र

  • जगभरातही शेअर बाजारात मिश्र हालचाल पाहायला मिळाली:

  • जपानचा निक्केई: 0.50 टक्क्यांनी वाढून 37741 वर बंद झाला.

  • दक्षिण कोरियाचा कोस्पी: 1.49 टक्क्यांनी चढून 2,812 वर बंद झाला.

  • हॉन्गकॉन्गचा हॅंगसेंग: 0.48 टक्क्यांनी घसरून 23,792 वर बंद झाला.

  • चीनचा शांघाय कंपोझिट: 3385 वर बंद

Share Marke
HDFC credit card new rules: या क्रेडिट कार्डधारकांसाठी विमानतळावर लाऊंज अ‍ॅक्सेस बंद होणार, वाचा नवे नियम

5 जूनपासून तेजी

5 जून रोजीही बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स 444 अंकांनी वधारून 81,442 वर बंद झाला, तर निफ्टी 130 अंकांनी वाढून 24,750 वर पोहोचला. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर्समध्ये तेजी तर 10 मध्ये घसरण पाहायला मिळाली.

5 जून रोजी NSE वरील प्रोव्हिजनल डेटानुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) कॅश सेगमेंटमध्ये 208 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 2,382 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

5 जून रोजी अमेरिकेच्या बाजारात घसरण नोंदवली गेली होती. डाऊ जोन्स 0.25 टक्क्यांनी घसरून 42319 वर बंद झाला. नॅस्डॅक कंपोझिटमध्ये 0.83 टक्क्यांची घसरण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news