Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेंसेक्स-निफ्टी आपटले, मेटल शेअर्स कोसळले

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने आज घसरणीसह सुरुवात केली. मेटल शेअर्सवर दबाव दिसला, तर FMCG क्षेत्रात खरेदी झाली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने घसरणीसह सुरुवात केली आहे. सेंसेक्स सुमारे 150 अंकांनी खाली आला, तर निफ्टीतही जवळपास 50 अंकांची घसरण दिसून आली. जागतिक संकेत मिश्र असल्याने गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसत आहेत.

ग्लोबल संकेतांचा बाजारावर प्रभाव

एकीकडे अमेरिका-इराण चर्चेची सकारात्मक चिन्हं आणि युद्धविरामाच्या शक्यतेमुळे जागतिक स्तरावर दिलासा मिळत असला, तरी कच्च्या तेलातील अस्थिरता आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. आशियाई बाजारांमध्ये घसरण दिसून येत असून GIFT Nifty सपाट ते किंचित घसरणीच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

कच्च्या तेलात चढ-उतार

हॉर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे खुली नसल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड काल $100 च्या जवळ गेला होता, तर आज सकाळी तो पुन्हा घसरून $98 च्या आसपास आला आहे. या अस्थिरतेचा थेट परिणाम बाजारातील सेंटिमेंटवर होत आहे.

कोणत्या सेक्टरवर दबाव?

आजच्या व्यवहारात मेटल सेक्टरमधील शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली.
तर दुसरीकडे FMCG सेक्टरमध्ये खरेदी दिसत असल्याने काही प्रमाणात बाजाराला आधार मिळाला.

Stock Market Today
India Oil Import Ban: भारताला मोठा झटका! रशिया-इराणकडून तेल खरेदीवर अमेरिकेचा ब्रेक; पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार?

FIIs-DIIsचा बदलता मूड

परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) जवळपास 994 कोटींची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) देखील सलग दुसऱ्या दिवशी विक्री करत 3,428 कोटींचे शेअर्स विकले. यामुळे बाजारावर अतिरिक्त दबाव आला आहे.

अमेरिकन बाजारातून सकारात्मक संकेत

अमेरिकन बाजारात मात्र तेजी कायम आहे. नॅस्डॅक सलग 12व्या दिवशी वाढीसह ऑल टाइम हाईवर बंद झाला आहे, तर S&P 500 आणि डाओ जोन्समध्येही तेजी दिसून आली. यामुळे भारतीय बाजाराला काही प्रमाणात सपोर्ट मिळू शकतो.

Stock Market Today
Unemployment Rate: बेरोजगारी दर वाढला; शहरांमध्ये परिस्थिती गंभीर… भारताची अर्थव्यवस्था संकटात?

सोन्या-चांदीत घसरण

कमोडिटी मार्केटमध्येही घसरण दिसली. सोने सुमारे 800 रुपयांनी घसरले, तर चांदीत तब्बल 3,100 रुपयांची घसरण झाली. ग्लोबल मार्केटमधील हालचालींचा परिणाम दिसून येत आहे.

कॉर्पोरेट ट्रिगर्सवर नजर

आज काही महत्त्वाच्या कंपन्यांच्या निकालांवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. HDFC Life चे निकाल अपेक्षेनुसार आले आहेत, Angel One चा परफॉर्मन्स मजबूत राहिला, तर Jio Financial चे निकाल आज जाहीर होणार आहेत. याशिवाय Wipro च्या ADR मध्ये घसरण झाली असली, तरी कंपनीच्या बायबॅक घोषणेने काहीसा आधार मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news