Stock Market Opening Updates | शेअर बाजार पडझडीतून सावरला, 'हे' शेअर्स तेजीत

सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढून खुला, जाणून घ्या आजचे मार्केट
Stock Market, Sensex, Nifty
सेन्सेक्स- निफ्टी आज हिरव्या रंगात खुले झाले.(File Photo)
Published on
Updated on

Stock Market Opening Updates

भारतीय शेअर बाजार बुधवारच्या सत्रातील पडझडीनंतर गुरुवारी (दि.२१) सावरला. सेन्सेक्स-निफ्टीने तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढून ८१,६४० वर गेला. तर निफ्टी ५० निर्देशांक १०० हून अधिक अंकांच्या वाढीसह २४,८०० वर व्यवहार करत आहे. आयटी, बॅकिंग आणि आयटी शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.

Sensex Today | 'हे' शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर सन फार्माचा शेअर्स २ टक्केहून अधिक वाढून खुला झाला आहे. एम अँड एम, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, टाटा स्टील हे शेअर्सही तेजीत व्यवहार करत आहेत. तर दुसरीकडे इर्टनलचा शेअर्स १.५ टक्के घसरला. इंडसइंड बँक, कोटक बँक आणि अदानी पोर्ट्स हे शेअर्स लाल रंगात खुले झाले आहेत.

Stock Market, Sensex, Nifty
UAE Gold Import | दुबईहून सोने आणणं आता कठीण! नव्या नियमांमुळे थेट आयात होणार नाही

निफ्टी फार्मा हिरव्या रंगात

सेक्टरल फ्रंटवर निफ्टी ऑटो, बँक, एफएमसीजी, फार्मा आणि रियल्टी निर्देशांक १ टक्के वाढले आहेत. निफ्टी फार्मा १.७ टक्के १.७ टक्के वाढला आहे.

Stock Market, Sensex, Nifty
Specialized Investment Fund | स्पेशलाईज्ड इन्व्हेस्टमेंट फंड, गुंतवणुकीचे नवे माध्यम, जाणून घ्या याविषयी...

देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजाराला आधार

दरम्यान, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) सलग दुसऱ्या सत्रात विक्री कायम ठेवली. एनएसईवरील आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी १०,०१६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. ही गेल्या दोन महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी विक्री आहे. दरम्यान, दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (DII) खरेदीमुळे बाजाराला मोठा आधार मिळाला. त्यांनी एका दिवसात ६,७३८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news