Stock Market Today: सलग सहाव्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; गुंतवणूकदारांचे 26 हजार कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण झाली असून, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे सुमारे 26 हजार कोटींचे नुकसान झाले.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या एक्सपायरीच्या दिवशी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही दबावाखाली आहेत. सुरुवातीच्या व्यवहारातच गुंतवणूकदारांना सुमारे 26 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

सेन्सेक्स 309 अंकांनी, निफ्टी 64 अंकांनी घसरला

मंगळवारी बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. निफ्टी 64 अंकांनी घसरून 24,223 वर, तर सेन्सेक्स 309 अंकांनी घसरून 77,419 वर उघडला.

बाजारातील घसरणीमुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल कमी होऊन सुमारे 492.19 लाख कोटी रुपये झाले. त्यामुळे बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 26 हजार कोटी रुपयांची घट झाली.

दरम्यान, रुपयावरही दबाव दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 6 पैशांनी घसरून 95.66 च्या पातळीवर उघडला.

मागील पाच दिवसांपासून बाजारात घसरण

गेल्या पाच ट्रेडिंग सेशनपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण दिसत आहे. सोमवारी निफ्टी 78 अंकांनी घसरून 24,287 वर बंद झाला होता. मागील नऊ सेशनपासून निफ्टी एका मर्यादित रेंजमध्ये व्यवहार करत आहे.

जागतिक बाजारात घसरण

भारतीय बाजारावर जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम होत आहे. अमेरिकन शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली असून डाओ जोन्स 272 अंकांनी घसरून बंद झाला. आशियाई बाजारांमध्येही विक्रीचा दबाव दिसत आहे. जपानचा निक्केई सुमारे 1.5 टक्क्यांनी, तर दक्षिण कोरियाचा KOSPI सुमारे 0.6 टक्क्यांनी घसरला आहे.

शेअर बाजार घसरण्याची कारणे

शेअर बाजारातील सध्याच्या घसरणीमागे काही महत्त्वाचे घटक आहेत. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव हा गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून टँकरची वाहतूक ठप्प झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून ब्रेंट क्रूड 91 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे. तेलाच्या वाढत्या किमतींचा भारतासारख्या मोठ्या तेल आयात करणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) विक्री सुरू ठेवली आहे. सोमवारी FII ने सुमारे 2,535 कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) सुमारे 5,101 कोटी रुपयांची खरेदी केली.

Stock Market Today
Donald Trump: 'आपण भारताकडून शिकलं पाहिजे'; डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्ञानेश कुमारांचं नाव घेत निवडणूक आयोगाचं केलं कौतुक

बाजारासाठी काही सकारात्मक संकेत

सध्या बाजारावर दबाव असला तरी काही सकारात्मक बाबीही आहेत. देशांतर्गत फंडांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने बाजाराला काही प्रमाणात आधार मिळत आहे.

तसेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये अद्याप मोठ्या घसरणीचे स्पष्ट संकेत दिसत नसल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

दीर्घकालीन दृष्टीने कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले येणे, देशांतर्गत गुंतवणूकदारांची खरेदी आणि FII विक्रीचा दबाव काही प्रमाणात कमी होणे हे सकारात्मक घटक मानले जात आहेत.

निफ्टीसाठी महत्त्वाच्या पातळ्या कोणत्या?

SAMCO Securities चे टेक्निकल रिसर्च विश्लेषक ओम मेहरा यांच्या मते, निफ्टीसाठी तातडीचा आधार 24,190 वर आहे. निफ्टी या पातळीखाली गेल्यास 24,050 हा पुढील महत्त्वाचा सपोर्ट मानला जात आहे. दुसरीकडे बाजारात तेजीची रिकव्हरी झाल्यास 24,500 च्या आसपास निफ्टीसाठी अडथळा येऊ शकतो.

टीप: कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news