
Stock market closing bell 18th July 2025
मुंबई : आठवड्याच्या तिसऱ्या व्यापार दिवशी बुधवारी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 139 अंकांनी घसरून 81,445 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 41 अंकांनी घसरून 24,812 वर बंद झाला.
आजच्या व्यवहारात फार्मा, IT, मेटल आणि मीडिया क्षेत्रात सर्वाधिक दबाव पाहायला मिळाला. यामध्ये 1.3 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. दुसरीकडे, ऑटो, प्रायव्हेट बँक आणि कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरमध्ये 0.8 टक्केपर्यंत वाढ झाली.
निर्देशांक सध्याची किंमत बदल टक्केवारी
सेंसेक्स 81445 -139 -0.17%
निफ्टी 24812 -41 -0.17%
BSE मिड कॅप 45691 -156 -0.34 %
BSE स्मॉल कॅप 53034 -179 -0.34%
निफ्टी टॉप गेनर्स
कंपनी शेअर किंमत (₹) वाढ (₹) टक्केवारीत वाढ
इंडसइंड बँक 847 38 4.69%
टायटन 3,479 73 2.15%
ट्रेंट 5728 102 1.80%
निफ्टी टॉप लूझर्स
कंपनी शेअर किंमत (₹) घट (₹) टक्केवारीत घट
TCS 3,455 60 -1.72
अडाणी पोर्ट्स 1,371 22 -1.57%
HUL 2,295 34 -1.44%
जपानचा निक्केई 0.90 टक्के वाढून 38885 वर
कोरियाचा कोस्पी 0.74% वाढून 2,972 वर
हॉन्गकॉन्गचा हॅंगसेंग 1.12% घसरून 23,711 वर
चीनचा शांघाय कंपोजिट 3,380 वर स्थिर
अमेरिकन बाजारात झाली होती घसरण
17 जून रोजी डाऊ जोन्स 0.70%, नॅस्डॅक 0.91% आणि S&P 500 0.84% नी खाली आले.
17 जून रोजी:
FII (परकीय गुंतवणूकदार): ₹1,482.77 कोटींची विक्री
DII (स्थानिक गुंतवणूकदार): ₹8,207.19 कोटींची खरेदी
जून 2025 (आत्तापर्यंत):
FII विक्री: ₹5,869.04 कोटी
DII खरेदी: ₹58,138.87 कोटी
एरिसइंफ्रा सॉल्यूशन्स लिमिटेड चा IPO आज, 18 जूनपासून ओपन झाला असून 20 जूनपर्यंत अर्ज करता येईल. शेअर्स 25 जून रोजी BSE आणि NSE वर लिस्ट होतील.
इश्यू साइज: ₹499.60 कोटी
फ्रेश इश्यू शेअर्स: 2.25 कोटी
OFS (ऑफर फॉर सेल): नाही
मंगळवारीही बाजार घसरला होता
17 जून रोजी सेंसेक्स 213 अंकांनी घसरून 81,583 वर बंद झाला होता. निफ्टीमध्ये 93 अंकांची घसरण झाली होती आणि तो 24,853 वर बंद झाला होता. त्यादिवशी फार्मा, हेल्थकेअर आणि मेटल क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली.