विक्रीचा मारा! शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फटका

Stock Market Crash | जाणून घसरणीचे कारणे?
Stock Market Updates Sensex Nifty
जागतिक कमकुवत संकेताच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेअर बाजार गडगडला. file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकेतील कमकुवत आर्थिक आकडेवारी आणि तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमु‍ळे जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याचे पडसाद आज आशियासह भारतीय शेअर बाजारात (Stock Market Crash) उमटले. भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) सुरुवातीच्या व्यवहारात ५५० अंकांनी घसरून ८२ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी (Nifty) १७० अंकांनी घसरून २५,१०० पर्यंत खाली घसरला. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांनी गमावले ३ लाख कोटी

आजच्या सुरुवातीच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ३.१ लाख कोटींचा फटका बसला. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४६२.४ लाख कोटी रुपयांवर आले.

Sensex Today : कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर इन्फोसिस, एम अँड एम, टेक महिंद्रा, टीसीएस, एलटी, ॲक्सिस बँक, एसबीआय, टायटन हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स तेजीत आहेत.

निफ्टी आयटी १.५ टक्क्यांनी घसरला

निफ्टीवर कोल इंडिया, LTIMindtree, विप्रो, ओएनजीसी, इन्फोसिस हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर एशियन पेंट्स, बीपीसीएल हे शेअर्स वाढले आहेत. निफ्टी आयटी १.५ टक्क्यांनी घसरला आहे. निफ्टी आयटीवर Mphasis, Coforge हे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

Global Market : जागतिक बाजारात हाहाकार

अमेरिकेतील शेअर बाजारासाठी मंगळवारचा दिवस ५ ऑगस्टनंतरचा सर्वात खराब दिवस ठरला. अमेरिकेच्या बाजारात मंगळवारी जोरदार विक्री दिसून आली. डाऊ जोन्स (Dow Jones Industrial Average) ६२६ अंकांनी घसरला. नॅस्डॅक ( Nasdaq Composite) ३ टक्क्यांनी खाली आला. अमेरिकेतील घसरणीनंतर आशियाई बाजारातही हाहाकार उडाला. जपानचा निक्केई सुमारे ३ टक्क्यांनी घसरला.

US slowdown : अमेरिकेतील संभाव्य मंदीची चिंता

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील संभाव्य मंदीच्या चिंतेमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. इन्स्टिट्यूट फॉर सप्लाय मॅनेजमेंट (ISM) च्या आकडेवारीवरुन असे दिसून आले की अमेरिकेतील ऑगस्टमधील मॅन्युफॅक्चरिंग मंदावले आहे. हे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कमकुवत स्थितीचे संकेत आहेत. ISMने म्हटले आहे की त्याचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय गेल्या महिन्यात जुलैमधील ४६.८ वरून ४७.२ वर पोहोचला होता. नोव्हेंबरनंतरचा हा सर्वात कमी पीएमआय आहे. ५० पेक्षा कमी पीएमआय असणे हे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील घट दर्शवते, ज्याचा अर्थव्यवस्थेत १०.३ टक्के वाटा आहे.

Stock Market Updates Sensex Nifty
कर्जमंजुरी आणि वितरणात ठरणार ‘यूएलआय’ गेमचेंजर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news