Stock Market Closing Updates | शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी उडाले

जाणून घ्या बाजारातील घसरणीमागील घटक कोणते?
Stock Market Closing Updates
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (दि.१३ जून) सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Stock Market Closing Updates

भारतीय शेअर बाजार शुक्रवारी (दि.१३ जून) सलग दुसऱ्या दिवशी कोसळला. सेन्सेक्स ५७३ अंकांनी घसरून ८१,११८ बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १६९ अंकांच्या घसरणीसह २४,७१८ पर्यंत खाली आला. एकूणच बाजारात आज व्यापक प्रमाणात विक्री दिसून आली. तर India VIX टक्क्यांहून अधिक वाढला, जो बाजारातील अस्वस्थतेचे संकेत देतो.

इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. तसेच पुरवठ्याबाबतच्या चिंतेने कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली. यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला. परिणामी, सेन्सेक्स- निफ्टी घसरले. सुरुवातीलाच सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरला होता. त्यानंतर तो काही प्रमाणात सावरताना दिसला.

Stock Market Closing Updates
8th Pay Commission Update | आठव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? काय आहे Fitment Factor? जाणून घ्या नवा हिशोब

सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. निफ्टी एफएमसीजी आणि पीएसयू बँक (Nifty PSU Bank) प्रत्येकी १ टक्के घसरले. निफ्टी ऑईल अँड गॅस, फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांकही घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.३ टक्के घसरले.

गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी उडाले

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १३ जून रोजी २.१० लाख कोटींनी कमी होऊन ४४७.४८ लाख कोटी रुपयांवर आले. याआधी १२ जून रोजी ते ४४९.५८ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांनी २.१० लाख लाख कोटी गमावले.

Stock Market Closing Updates
Gold Rate Today | सोन्याची ऐतिहासिक उसळी! दर १ लाख पार, जाणून घ्या सोने इतके का महागले?

'या' शेअर्संवर दबाव

सेन्सेक्सवर सर्वाधिक घसरण अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये दिसून आली. हा शेअर्स २.७ टक्के घसरला. आयटीसी, एसबीआय, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, टायटन, कोटक बँक, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्सही घसरले. तर टेक महिंद्राचा शेअर्स १ टक्के वाढला. टीसीएस, मारुती, सन फार्मा हे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news