Stock Market Closing Bell | सेन्सेक्स सपाट, Nifty सलग १४ व्या सत्रात तेजीत बंद

शेअर बाजारात आज काय घडलं?
Stock Market Sensex Nifty
सेन्सेक्स आणि निफ्टी आज मंगळवारी (दि. ३ सप्टेंबर) सपाट पातळीवर बंद झाले.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि. ३) सुस्त स्थिती दिसून आली. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. बीएसई सेन्सेक्सची सलग ११ व्या सत्रातील तेजी आज थांबली. तर निफ्टी ५० ची सलग १४व्या सत्रात तेजी कायम राहिली. सेन्सेक्स आज ८२,५५५ च्या सपाट पातळीवर बंद झाला. तर निफ्टी केवळ १ अंकाच्या वाढीसह सलग १४ व्या सत्रात २५,२७९ वर हिरव्या रंगात बंद झाला. निफ्टी बँकची मजबूत स्थिती राहिली.

ठळक मुद्दे

  • सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर बंद.

  • बीएसई सेन्सेक्सच्या सलग ११ व्या सत्रातील तेजीला ब्रेक.

  • निफ्टी ५० ची सलग १४व्या सत्रात तेजी कायम.

  • निफ्टी बँकची मजबूत स्थिती.

  • बीएसई मिडकॅप किरकोळ वाढीसह बंद.

  • स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढला.

क्षेत्रीय निर्देशांकात बँक आणि कॅपिटल गुड्स निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले, तर मीडिया, मेटल, रियल्टी आणि ऑईल आणि गॅस ०.५ ते १.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाला आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढला.

Sensex Today : कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स हे शेअर्स घसरले. तर आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, टायटन, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया हे शेअर्स तेजीत वाढले.

BSE Sensex
सेन्सेक्सवरील १२ शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले.(BSE)

Nifty सलग १४ व्या सत्रात वाढून बंद

निफ्टी आज सलग १४ व्या सत्रात वाढून बंद झाला. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या हेवीवेट शेअर्समधील तेजीचा निफ्टीला सपोर्ट मिळाला. निफ्टीवर एसबीआय लाईफ, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाईफ, हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स प्रत्येकी १ टक्क्यांहून अधिक वाढले. तर बजाज फायनान्स, ओएनजीसी, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेक शेअर्समध्ये प्रत्येकी १ टक्के घसरण झाली.

NSE Nifty
निफ्टी आज २५,३०० च्या खाली बंद झाला.(NSE)
Stock Market Sensex Nifty
रिफंड कमी मिळालाय?; रिक्वेस्ट फाईल करू शकता, जाणून घ्या प्रक्रिया

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news