
Stock Market Closing Bell on June 20th, 2025
मुंबई : आठवड्याच्या अखेरच्या व्यापारादिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. सेंसेक्स 1046 अंकांनी उसळून 82408 या सर्वोच्च पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 319 अंकांनी वाढून 25112 वर स्थिरावला.
सेंसेक्समधील 30 पैकी 27 शेअर्स वधारले, तर फक्त 3 शेअर्समध्ये घसरण झाली.
एअरटेल, नेस्ले आणि M&M च्या शेअर्समध्ये 3.2% पर्यंतची तेजी पाहायला मिळाली.
दुसरीकडे, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट आणि अॅक्सिस बँक यांचे शेअर्स थोडेसे घसरले.
निफ्टीमधील 50 पैकी 44 शेअर्स तेजीत बंद झाले.
NSE रिअल्टी इंडेक्समध्ये सर्वाधिक 2.11% वाढ झाली.
हेल्थकेअर, बँकिंग, IT, मेटल, मीडिया, फार्मा इंडेक्समध्येही 1.6% पर्यंतची तेजी पाहायला मिळाली.
भू-राजकीय तणाव कमी होण्याची अपेक्षा: ईरान-इस्त्राईल संघर्ष सौम्य होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हाईट हाऊसने स्पष्ट केलं आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यांत हस्तक्षेपाचा निर्णय घेतील.
देशी व विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी: FIIs (परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) यांनी गुरुवारी ₹934.62 कोटींची खरेदी केली.
DIIs (देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार) यांनी ₹605.97 कोटींची खरेदी केली.
RBI कडून इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंगसाठी सवलत: रिझर्व्ह बँकेने बँका व NBFCs साठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससंदर्भातील प्रोव्हिजनिंग नियम सुलभ केले आहेत, ज्यामुळे बँकिंग शेअर्समध्ये तेजी आली.
जपानचा निक्केई: 85 अंकांनी घसरून 38,403 वर बंद
कोरिया कोस्पी: 44 अंक (1.48%) वाढून 3,022 वर
हॉंगकॉंग हँगसेंग: 292.74 अंक वाढून 23,530 वर
शांघाय कंपोजिट: 2 अंकांनी घसरून 3,360 वर
जून 19 हा अमेरिकेत "जूनटीन्थ" म्हणून साजरा केला जातो – 19 जून 1865 रोजी टेक्सासमध्ये गुलामीची समाप्ती झाली होती. यानिमित्ताने अमेरिकन बाजार बंद राहिले.
एरिसइंफ्रा सॉल्यूशन्स लिमिटेड चा IPO १८ जूनला खुला झाला होता आणि 20 जून हा गुंतवणुकीसाठी शेवटचा दिवस होता.
कंपनी या IPO द्वारे एकूण ₹499.60 कोटी उभारणार आहे. 2.25 कोटी फ्रेश शेअर्स जारी केले जाणार, कोणताही शेअर प्रमोटर्स कडून OFS (Offer For Sale) स्वरूपात विकला जाणार नाही. 25 जून रोजी BSE आणि NSE वर लिस्टिंग अपेक्षित आहे.