Stock Market Closing Bell : शेअर बाजाराची ‘सकारात्‍मक’ वाटचाल, सेन्सेक्स १४९ अंकांनी वधारला

Stock Market Closing Bell : शेअर बाजाराची ‘सकारात्‍मक’ वाटचाल, सेन्सेक्स १४९ अंकांनी वधारला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशांतर्गत शेअर बाजार आज किंचित वाढीसह खुले झाले. दिवसभराच्‍या व्‍यवहारात ही सकारात्‍मक वाटचाल कायम राहिली. सेन्सेक्स 149 अंकांच्या वाढीसह 76,606.57 वर बंद झाला, तर निफ्टी 50 58 अंकांनी वाढून 23,322.95 वर स्थिरावला.

आज बाजारात काय घडलं ?

  • निफ्टीने 23,441 चा नवा विक्रम केला
  • नवा विक्रम केल्यानंतर बाजारात नफा वसुलीवर भर
  • निफ्टी 58 अंकांनी वाढून 23,322 वर बंद
  • सेन्सेक्स 149 अंकांनी वाढून 76,606 वर बंद
  • निफ्टी बँक 189 अंकांनी वाढून 49,895 वर बंद

आज देशांतर्गत शेअर बाजार आज किंचित वाढीसह खुले झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढीसह उघडताना दिसत आहेत. 12 जून रोजी मिश्र जागतिक संकेतांमुळे निफ्टी 23300 च्या वर उघडला. सेन्सेक्स 147.65 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांनी वाढून 76,604.24 वर व्यवहार करत होता. निफ्टी 48.70 अंकांनी किंवा 0.21 टक्क्यांनी वाढून 23,313.50 वर व्यवहार करत होता.

निफ्टी आणि मिडकॅप निर्देशांकाने इंट्राडेमध्ये नवीन विक्रमी उच्चांक गाठला होता, परंतु बंद होण्यापूर्वी बाजारात गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्‍य .िदिले.  ट्रेंड गेल्या अनेक सत्रांपासून बाजारात दिसून येत आहे. निफ्टीने इंट्राडेमध्ये 23,441 चा नवा विक्रम रचला होता आणि निफ्टी मिडकॅप देखील प्रथमच 54,300 च्या वर गेला होता. निफ्टी 58 अंकांनी वाढून 23,322 वर बंद झाला. सेन्सेक्स 149 अंकांनी वाढून 76,606 वर बंद झाला. निफ्टी बँक 189 अंकांनी वाढून 49,895 वर बंद झाला.

निफ्टी मिडकॅपने प्रथमच पार केला ५४,००० हजारांचा टप्‍पा

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टी मिडकॅपने प्रथमच 54,000 चा टप्पा पार केला आहे. बीपीसीएल, एचपीसीएल, एचसीएल टेक, एलटीआयएम, इन्फोसिस, टेक महिंद्रा यासह अनेक तेल आणि आयटी समभागांमध्ये वाढ झाली आहे.

2001 शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 496 समभाग घसरले. 105 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. निफ्टीमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, बीपीसीएल, विप्रो आणि एलटीआयमिंडट्री हे प्रमुख वधारले. तर एशियन पेंट्स, टायटन कंपनी, ग्रासिम, एनटीपीसी आणि एचयूएल हे समभाग घसरले.

हे शेअर्स ठरले टॉप गेनर्स

सेन्सेक्स आणि निफ्टी वधारत बंद झाले. आजच्या बाजारात मिड आणि स्मॉल कॅप शेअर्स चमकले. कोल इंडिया, पॉवर ग्रिड, SBI लाइफ इन्शुरन्स, LTIMindtree आणि Eicher Motors यांचा निफ्टीमधील टॉप गेनर्स ठरले तर ब्रिटानिया, HUL, M&M, टायटन कंपनी आणि टाटा कंझ्युमरच्‍या शेअर्संनी घसरण अनुभवली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी 1 टक्क्यांनी वाढले.

रुपया 2 पैशांनी मजबूत झाला

भारतीय रुपया आज 2 पैशांनी मजबूत झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांनी मजबूत झाला आणि 83.55/$ वर बंद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news