Lok sabha Election 2024 Results : निवडणूक निकाल ‘इफेक्‍ट’, शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांच्‍या संपत्तीत ३६ लाख कोटींची घट

Stock Market Crash
Stock Market Crash
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर आज (दि.४ जून) देशांतर्गत शेअर बाजाराने विक्रमी घसरण अनुभवली. एक्झिट पोलने दाखविल्याप्रमाणे भाजपला एकहाती सत्ता मिळणार नसल्‍याचे संकेत मिळताच सेन्सेक्स 1.80% घसरला आणि 75,180 च्या आसपास उघडला. निफ्टी देखील 1.70% पेक्षा जास्त घसरणीसह 22,900 च्या वर उघडला. दिवसभर पडझडीचे सत्र कायम राहिले. अखेर आजचे व्‍यवहार बंद हाेताना सेन्सेक्स 5.7% घसरणीने 72,079 वर बंद झाला. निफ्टी 6% घसरून 21,884 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 8% घसरून 46,929 वर बंद झाला.

आज शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

सेन्सेक्स 1.80% घसरला आणि 75,180 च्या आसपास उघडला. निफ्टी देखील 1.70% पेक्षा जास्त घसरणीसह 22,900 च्या वर st निफ्टी बँक 1.90% च्या घसरणीसह 50,000 च्या पातळीवर उघडला. रुपया ९ पैशांनी कमजोर झाला आणि ८३.२३/$ वर उघडला. यानंतर सेन्सेक्स जवळपास 4700 अंकांनी तर निफ्टी जवळपास 1500 अंकांनी पडझड झाली. बँक निफ्टी सुमारे 4200 अंकांनी घसरला, मिडकॅपमध्ये सुमारे 4500 अंकांची तर स्मॉलकॅपने सुमारे 1500 अंकांची घसरण अनुभवली.

निफ्टीने 2024 चा संपूर्ण फायदा गमावला

निफ्टीने 2024 मध्ये आतापर्यंत मिळवलेला संपूर्ण फायदा गमावला आहे. अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, ओएनजीसी, एनटीपीसी आणि कोल इंडियाचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले.

गुंतवणूकदारांच्‍या संपत्तीत २९ लाख कोटींची घट

निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. निवडणुकीच्या निकालांदरम्यान एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील निकराच्या लढतीत सेन्सेक्स पहिल्यांदाच 6000 अंकांनी घसरला. दुपारी 12:16 वाजता सेन्सेक्स 5188.93 (6.79%) अंकांनी घसरला आणि 71,279.85 च्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी 1,627.10 (6.99%) अंकांनी घसरला आणि 21,636.80 वर व्यवहार करताना दिसला.  आजच्‍या पडझडीत  गुंतवणूकदारांच्‍या संपत्तीत सुमारे २९ लाख कोटी रुपयानी घट झाली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजार कसा होता?

  • 1999 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 0.24% ने घसरले. 1999 मध्ये एनडीएचा विजय झाला आणि अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले होते.
  • 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सेन्सेक्समध्ये 11.10% ची घसरण नोंदवली गेली होती. या निवडणुकीत रालोआला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
  • 2009 लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 17% पेक्षा जास्त वधारले होते. या निवडणुकीत काँग्रेस नेतृत्त्‍वाखालील संयुक्‍त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार पुन्हा सत्तेवर आले होते.
  • 2014 मध्ये निवडणूक निकालाच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे 0.90% वाढले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला होता. नरेंद्र मोदी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान झाले.
  • 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजाराने सुमारे 0.76% ची घसरण नोंदवली होती. 2019 मध्ये भाजप प्रणित एनडीए पुन्हा सत्तेत आले होते. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले.

लाेकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बाजारातील स्थिती

  • 1999 शेअर बाजार घसरला
  • 2004 शेअर बाजार कोसळला
  • 2009 शेअर बाजार वधारला
  • 2014 शेअर बाजार मजबूत झाला
  • 2019 शेअर बाजारातील घसरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news