

Share Market News May 5th 2025
मुंबई : भारतीय शेअर बाजारातील गेल्या आठवड्यातील तेजीनंतर सोमवारी 5 मे रोजीदेखील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली. सेन्सेक्स 294.85 (0.37 टक्के) अंकांनी वाढून 80796 वर बंद झाला.
तर निफ्टी 114.45 (0.47 टक्के) अंकांनी वाढून 24461 अंकांवर बंद झाला. मिडकॅप निर्देशांकात 971 अंशांची वाढ होऊन तो 54,676 वर बंद झाला.
दरम्यान, आज सोमवारी बँकिंग क्षेत्रातील शेअर्सच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.
बँक निफ्टीमध्ये 195.85 (0.36 टक्के) घट झाली. मार्केट बंद झाले तेव्हा बँक निफ्टी निर्देशांक 54919.50 वर ट्रेड करत होता. ऑटो सेक्टरमध्ये सोमवारी वाढ दिसून आली. निफ्टी ऑटोमध्ये 412 अंकांनी वाढ झाली. ही वाढ 1.85 टक्के इतकी आहे. त्यामुळे निफ्टी ऑटोचा भाव मार्केट बंद होताना 22699.20 होता.
टॉप गेनर आणि लूजर
सोमवारी अदानी एंटरप्रायजेस या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. 161.30 अंकांनी हा शेअर वाढून तो 2455.50 वर पोहचला. ही वाढ 7.03 टक्के इतकी होती. तर बँकिंग क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. हा शेअर 100.30 रूपयांनी म्हणजेच 4.59 टक्क्यांनी घसरून 2084.90 वर आला.
स्विगीच्या शेअरमध्ये लिस्टिंगनंतरची सर्वात मोठी एकदिवसीय झेप दिसून आली. हा शेअर 12 टक्क्यांनी वाढला. Trent मध्ये जोरदार खरेदी दिसून आली. टॉप निफ्टी गेनर्सपैकी एक असलेला हा शेअर असून त्यात 4 टक्के वाढ झाली.
एसबीआय आणि कोटर महिंद्रा बँक स्टॉकच्या तिमाही निकालाचा परिणाम या स्टॉक्सवर पाहायला मिळाला. मेटल शेअर्सनी 3 दिवसांची घसरण थांबवली. निफ्टी मेटल निर्देशांकात 1 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली.
क्रूड सेंसिटिव्ह शेअर्समध्ये मोठी हालचाल पाहायला मिळाली. IOC, HPCL, BPCL, पेंट कंपन्या आणि एअरलाईन्स शेअर्समध्ये प्रचंड तेजी दिसून आली. क्रूडच्या किंमतीतील घसरणीचा फायदा दिसून आला.
तत्पूर्वी आज सकाळी सुरवातील सेन्सेक्समध्ये 386.95 अंकांची वाढ झाली होती. सलग 12 व्या दिवशी 'एफआयआय' रोखीने खरेदी करताना दिसत आहेत. ऑटो स्केटरमधील शेअर्स आज तेजीत होते. तसेच आयटी ते फार्मा आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्येही सुरवातीला वाढ दिसून आली.