Share Market Closing Bell : सेन्सेक्स 849 अंकांनी कोसळला, जाणून घ्‍या घसरणीमागील प्रमुख कारणे

ट्रम्‍प टॅरिफच्‍या भीतीचा बाजारावर परिणाम, सर्वच चिन्‍हे लाल रंगात बंद
Share Market opening bell
भारतीय शेअर बाजारावर दबाव कायम राहिला आहे.(file photo)
Published on
Updated on

Share Market Closing Bell

शेअर बाजारात आज (दि. २६ ऑगस्‍ट) मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 849 अंकांनी कोसळून 80,786 वर बंद झाला. निफ्टी 255 अंकांनी कमकुवत होऊन 24,712 वर बंद झाला. बँक निफ्टी 688 अंकांनी घसरून 54,450 वर बंद झाला. रुपयाही 10 पैशांनी घसरून 87.68 प्रति डॉलरवर बंद झाला.

Pudhari

जवळपास सर्वच क्षेत्रे लाल चिन्हात

ट्रम्प टॅरिफच्या अधिसूचनेच्या भीतीने बाजारावर नकारात्‍मक परिणाम झाला. जवळपास सर्वच क्षेत्रे लाल चिन्हात गेली. आज फक्त एफएमसीजी (FMCG) क्षेत्रात किरकोळ खरेदी दिसून आली. तर फार्मा, आयटी आणि रियल्टी क्षेत्रात मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी फार्मा निर्देशांक तर एक टक्क्याहून अधिक घसरला.बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स-निफ्टी सुमारे 1% घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्री झाली. निफ्टी बँक निर्देशांक सुमारे 1.3% घसरून बंद झाला. निफ्टी बँक 15 मे 2025 च्या नीचांकी पातळीवर बंद झाला. एफएमसीजी (FMCG) वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण झाली. रियल्टी, डिफेन्स, पीएसई (PSE) शेअर्समध्ये विक्रीचा जोर राहिला. धातू, फार्मा, तेल आणि वायू निर्देशांक 1.5% पेक्षा जास्त घसरले. आज व्‍यवहार संपताना सेन्सेक्स 849.37 अंकांनी म्हणजेच 1.04 टक्क्यांनी घसरून 80,786.54 च्या पातळीवर बंद झाला. तर, निफ्टी 255.70 अंकांनी म्हणजेच 1.02 टक्क्यांनी घसरून 24,712.05 च्या पातळीवर बंद झाला.

Pudhari

निफ्टीत सर्वाधिक घसरलेले शेअर्स: श्रीराम फायनान्स, सन फार्मा, टाटा स्टील, बजाज फायनान्स, ट्रेंट.

निफ्टीत सर्वाधिक वाढलेले शेअर्स: आयशर मोटर्स, एचयूएल, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, आयटीसी.एफएमसीजी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. पीएसयू बँक, मेटल, रियल्टी आणि टेलिकॉम निर्देशांक 1 ते 2 टक्क्यांनी घसरले.

Share Market opening bell
वेध शेअर बाजाराचा : मोठी झेप घेण्याच्या पवित्र्यात भारतीय बाजार ?

आजच्‍या घसरणीमागील प्रमुख कारणे

  • ट्रम्प यांच्या टॅरिफ लागू करण्याच्या आदेशामुळे बाजारातील सकारात्‍मक वातावरण खराब झाले

    विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) विक्रीचा मारा

  • किरकोळ गुंतवणूकदारांनी खरेदीतून हात आखडता घेतला

  • निफ्टी आणि बँक निफ्टीमधील महत्त्वाचे स्तरावर झालेल्‍या पडझडीने नुकसान थांबवण्याची मर्यादा ओलांडली गेली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news