सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह खुले, अदानींचा 'हा' शेअर्स तेजीत

Stock Market Updates | शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी दबाव
Stock Market Updates Sensex Nifty
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि.१३) सलग दुसऱ्या दिवशी दबाव दिसून येत आहे.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजारात (Stock Market Updates) मंगळवारी (दि.१३) सलग दुसऱ्या दिवशी दबाव दिसून येत आहे. जागतिक संमिश्र संकेताच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) १०० अंकांनी घसरून ७९,५६० च्या वर होता. तर निफ्टी (Nifty) २४,३५० च्या जवळ व्यवहार करत आहे. एचडीएफसी बँकेचा शेअर्स २ टक्क्यांनी घसरला आहे. तर एनएसईवर अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर्स २ टक्क्यांनी वाढला आहे.

Sensex Today : कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) शेअर्स २ टक्क्यांनी घसरला आहे. एशियन पेंट्स, टायटन, टाटा मोटर्स हे शेअर्सही लाल रंगात खुले झाले आहेत. तर आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, कोटक बँक, एनटीपीसी हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.

निफ्टीवर एचडीएफसी बँक, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स हे शेअर्स घसरले आहेत. अपोलो हॉस्पिटल, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, ॲक्सिस बँक हे शेअर्स तेजीत आहेत.

शेअर बाजारात (Stock Market) सोमवारी (दि. १२) सुरुवातीला काही प्रमाणात हिंडेनबर्ग इम्पॅक्ट (hindenburg report on adani) दिसून आला होता. पण भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सोमवारी घसरणीतून सावरत सपाट पातळीवर बंद झाले होते. तर आज मंगळवारी देखील दोन्ही निर्देशांक किरकोळ घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Stock Market Updates Sensex Nifty
आर्थिक स्वातंत्र्याचे करू या नियोजन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news