Stock Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; सरकारी बँकांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिला धक्का

Stock Market Under Pressure: BSE Sensex आणि Nifty 50 मासिक एक्सपायरीच्या दिवशी दबावाखाली दिसले, तर सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Under Pressure: भारतीय शेअर बाजारात आज मासिक एक्सपायरीच्या दिवशी अस्थिर वातावरण पाहायला मिळालं. सुरुवातीच्या व्यवहारात BSE Sensex तब्बल 130 अंकांनी घसरून 77,172 वर व्यवहार करत होता, तर Nifty 50 24 हजारांच्या वर टिकून असला तरी दबावाखाली दिसत होता. विशेषतः सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याने बँकिंग क्षेत्रावर ताण वाढला.

Nifty Bank निर्देशांक 361 अंकांनी घसरला, तर PSU बँक निर्देशांकात 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सरकारी बँकांच्या शेअर्समधील विक्रीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढलेली दिसून आली.

दरम्यान, जागतिक घडामोडींनीही बाजारावर प्रभाव टाकला आहे. इराणने अमेरिकेला शांततेचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याने भू-राजकीय तणाव काहीसा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र कच्च्या तेलाचे दर अजूनही उच्च पातळीवर असल्याने बाजारातील अस्थिरता कायम आहे.

ब्रेंट क्रूडचा दर सलग सहाव्या दिवशी वाढत जवळपास 108 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. याचा परिणाम भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकन बाजारात मात्र तेजीचं वातावरण कायम आहे. Nasdaq Composite आणि S&P 500 यांनी नवा उच्चांक गाठला. मात्र डाऊ जोन्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण दिसून आली.

Stock Market Today
IT Sector Crisis: AI आणि जागतिक मंदीमुळे हाहाकार; भारतीय आयटी क्षेत्राला मोठा फटका, नेमकं काय घडतयं?

भारतीय बाजारासाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सलग सहाव्या दिवशी भारतीय बाजारातून पैसे काढले. दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी करून काही प्रमाणात बाजाराला आधार दिला.

सोन्या आणि चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली. चांदीचा भाव जवळपास 2,800 रुपयांनी घसरला, तर सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची घसरण झाली.

आज बाजाराचं लक्ष अनेक मोठ्या कंपन्यांच्या निकालांकडे लागलं आहे. Maruti Suzuki आणि Coal India यांसारख्या कंपन्यांचे निकाल गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

Stock Market Today
Paytm Impact: Paytm पेमेंट्स बँक बंद झाल्यानंतर तुमच्या EMI, SIP आणि OTT पेमेंटचं काय होणार? जाणून घ्या सर्व माहिती

याशिवाय Reserve Bank of India ने कर्ज वितरणासंदर्भात नवीन ECL नियम जाहीर केले आहेत. 2027 पासून लागू होणाऱ्या या नियमांमुळे बँकांच्या कर्ज व्यवस्थापन पद्धतीत मोठे बदल होणार आहेत.

एकूणच, जागतिक तणाव, महागडं कच्चं तेल, एफ अँड ओ एक्सपायरी आणि मोठ्या कंपन्यांचे निकाल या सर्व घटकांमुळे आजचा बाजार दबावाखाली दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news