बाजार गडगडला! ६ लाख कोटींचा चुराडा, घसरणीमागील ३ प्रमुख कारणे

Stock Market Crash | इंडसइंड बँक शेअर्स १९ टक्क्यांनी घसरला, नेमकं काय झालं?
Stock Market Crash
आज सेन्सेक्स सुमारे ८०० अंकांनी घसरला.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा आणि कार्पोरेट कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीतील कमकुवत कमाई अहवालादरम्यान आज शुक्रवारी (दि.२५) भारतीय शेअर बाजार सलग पाचव्या सत्रात (Stock Market Crash) घसरणीसह बंद झाला. आजच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) सुमारे ९०० अंकांनी घसरला. तर निफ्टी (Nifty) २७० अंकांनी घसरून २४,१०० वर आला. त्यानंतर सेन्सेक्स ६६२ अंकांच्या घसरणीसह ७९,४०२ वर बंद झाला. तर निफ्टी २१८ अंकांनी घसरून २४,१८० वर स्थिरावला. मुख्यतः इंडसइंड बँक शेअर्सचा घसरणीचा मोठा फटका दोन्ही निर्देशांकांना बसला.

गुंतवणूकदारांना ६ लाख कोटींचा फटका

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, आजच्या बाजारातील घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ६.०३ लाख कोटींनी कमी होऊन ४३७.७६ लाख कोटींवर आले.

निफ्टी ऑटो, मेटल निर्देशांक घसरला

क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी ऑटो, निफ्टी मेटल, पीएसयू बँक प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. तर निफ्टी बँक १.४ टक्के घसरला. मिडकॅप १.४ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप २.४४ टक्क्यांनी घसरला.

भयसूचकांक ‘India VIX’ वाढला

आजच्या सत्रादरम्यान भयसूचकांक निर्देशांक इंडिया व्हिक्स (India VIX) ६ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. हा निर्देशांक बाजारातील गुंतवणूकदारांमधील अस्वस्थता दर्शवतो. भारतीय शेअर बाजाराचा चढ-उतार दर्शक (व्हीक्स) राष्ट्रीय सूचकांक निफ्टीमधील वायदा बाजार व्यवहाराच्या ३० दिवसांच्या अपेक्षित चढउताराशी निगडित आहे. त्यामध्ये आज वाढ दिसून आली. यामागे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटक कार्यरत आहेत.

कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर इंडसइंड बँकचा शेअर्स तब्बल १९ टक्क्यांनी घसरून १,०२८ पर्यंत खाली आला. त्याचबरोबर एम अँड एमचा शेअर्स ५ टक्के, एनटीपीसी ४ टक्के, एलटी ३ टक्के घसरला. अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी खाली आले. तर आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा, ॲक्सिस बँक आदी शेअर्सनी तेजीत व्यवहार केला.

IndusInd Bank चा शेअर्स गडगडला, नेमकं काय झालं?

इंडसइंड बँकेने सप्टेंबर २०२४ ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ३९ टक्के घट नोंदवली आहे. या बँकेचा दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा १,३२५ कोटी रुपये राहिला. गेल्या वर्षी याच तिमाहीत या बँकेचा नफा २,१८१ कोटी रुपये होता. या पार्श्वभूमीवर इंडसइंड बँकेचा शेअर्स आज १९ टक्क्यांनी घसरून १,०३० रुपयांपर्यंत खाली आला.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर्सची विक्री सुरुच आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, २४ ऑक्टोबरपर्यंत एका महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुमारे ९८ हजार कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे. तर शेअर बाजाराला देशांर्गत गुंतवणूकदारांकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सुमारे ९२ हजार कोटींच्या शेअर्स खरेदी केली आहे. चीनच्या बाजारांतील स्वस्त मूल्यांकनामुळे परदेशी गुंतवणूकदार तिकडे निधी वळवला आहे.

अमेरिकेत निवडणूक; बाजारात अनिश्चितता

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात अनिश्चितता वाढत असल्याचे दिसून येत आहे. मध्य पूर्वेतील संघर्षाचे सावटही बाजारावर कायम आहे.

Stock Market Crash
‘एसटीपी’च्या माध्यमातून मिळवा परतावा चांगला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news