Stock market crash | बेअर अटॅक! सेन्सेक्स १,२०० अंकांनी घसरला, IT शेअर्संना फटका

शेअर बाजारातील घसरणीची कारणे काय?
Stock Market Crash
आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स १,२७२ अंकांनी घसरून ७९ हजारांच्या खाली आला. (File Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयटी शेअर्समधील विक्रीदरम्यान आज गुरुवारी (दि.२८) भारतीय शेअर बाजार (Stock market crash) गडगडला. सेन्सेक्स आणि निफ्टी आज सुमारे १.५ टक्के घसरले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) १,२७२ अंकांनी घसरून ७९ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) २४ हजारांच्या खाली घसरला. त्यानंतर सेन्सेक्स १,१९० अंकांच्या घसरणीसह ७९,०४३ वर बंद झाला. तर निफ्टी ३६० अंकांनी घसरून २३,९१४ वर स्थिरावला.

Summary

ठळक मुद्दे

  • सेन्सेक्स १,१९० अंकांच्या घसरणीसह ७९,०४३ वर बंद.

  • निफ्टी ३६० अंकांनी घसरून २३,९१४ वर स्थिरावला.

  • निफ्टी आयटी २.३ टक्के घसरला.

  • बीएसई मिडकॅप सपाट पातळीवर बंद.

  • स्मॉलकॅप ०.४ टक्के वाढला.

क्षेत्रीय निर्देशांकांतील ऑटो, बँक, आयटी, एफएमसीजी, एनर्जी ०.५ ते २ टक्के घसरले. तर पीएसयू बँक निर्देशांक १ टक्के आणि मीडिया निर्देशांक ०.३ टक्के वाढला. बीएसई मिडकॅप सपाट पातळीवर बंद झाला. तर स्मॉलकॅप ०.४ टक्के वाढला.

NSE Nifty
निफ्टी ५० निर्देशांक आज २४ हजारांच्या खाली घसरला. (NSE)

Nifty IT ४ टक्क्यांपर्यंत घसरला, कारण काय?

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणात्मक भूमिकेबद्दलची चिंता आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीबाबतच्या अनिश्चिततेचा बाजारातील भावनांवर परिणाम दिसून आला. तसेच अमेरिकेच्या महागाईवाढीच्या आकडेवारीमुळे व्याजदर कपातीची गती अपेक्षेपेक्षा कमी राहणार संकेत मिळत आहेत. याचा फटका आज आयटी शेअर्सना बसला. आयटी कंपन्यांचे शेअर्स आज ४ टक्क्यांपर्यंत घसरले. निफ्टी आयटी निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक घसरला. निफ्टी आयटीवर इन्फोसिस आणि L&T Technology हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्केहून अधिक घसरले. त्याचसोबत एचसीएल टेक, टेक महिंद्रा, Mphasis हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले.

Adani stocks : अदानी शेअर्समध्ये जोरदार रिकव्हरी

आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, टीसीएस, एम अँड एम, एचडीएफसी बँक हे हेवीवेट शेअर्सही घसरले. दरम्यान, आज अदानी समुहाच्या शेअर्समध्ये रिकव्हरी कायम राहिली. अदानी टोटल गॅसचा शेअर्स आज १४ टक्के वाढला. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर्स १० टक्केपर्यंत वाढला. अदानी पॉवर, अदानी एंटरप्रायजेस हे शेअर्सही आज वधारले.

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह सात जणांवर अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टात लाचखोर (US bribery charges) आणि फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला. यानंतर अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले. त्यांच्या काही शेअर्सना लोअर सर्किट लागले होते. पण आत त्यांच्या शेअर्समध्ये जोरदार रिकव्हरी दिसून येत आहे. अदानी समुहाने गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यावर अमेरिकेतील कोर्टाने केलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत. गौतम अदानी, सागर अदानी आणि वरिष्ठ कार्यकारी विनीत जैन यांच्यावर अमेरिकेतील फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) चे उल्लंघन केल्याचा आरोप लाचखोर प्रकरणात दाखल करण्‍यात आलेला नाही, असा दावा अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ने एका निवेदनाद्वारे केला.

'हे' शेअर्स घसरले

एनएसई निफ्टीवर एसबीआय लाईफचा शेअर्स ५ टक्के घसरला. त्यासोबतच एम अँड एम, इन्फोसिस, एचडीएफसी लाईफ, बजाज फायनान्स हे शेअर्स ३ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले. तर अदानी एंटरप्रायजेस, श्रीराम फायनान्स हे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्सवर एसबीआयचा शेअर्स वगळता सर्व शेअर्स लाल रंगात बंद झाले.

BSE Sensex
सेन्सेक्सवर एसबीआयचा शेअर्स वगळता इतर सर्व शेअर्स लाल रंगात बंद झाले. (BSE)
Stock Market Crash
गुंतवणुकीसाठीचा नियम ७२ आणि नियम ११४ काय आहे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news