नियम ७२ आणि नियम ११४ गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल हे जाणून घेण्यास मदत करतात. हे नियम म्हणजे महत्त्वाची साधने असून त्यांचा वापर करून तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन अधिक प्रभावीपणे तयार करू शकता आणि महागाईवर मात करत गुंतवणुकीला योग्य दिशा देऊ शकता.
जेव्हा आपण आपल्या भविष्यासाठी आर्थिक योजना बनवतो तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न नेहमी येतो, आपण आपल्या आर्थिक उद्दिष्टांसाठी लागणारे पैसे वाचवू शकू का? उदाहरणार्थ, मुलांच्या उच् शिक्षणासाठी किंवा निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजांसाठी पुरेसे पैसे उभे करता येतील का? ही करण्यासाठी आपली गुंतवणूक घेणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीचे विशेष नियम यामध्ये मदत करतात - नियम ७२ आणि नियम ११४ हे यामध्ये प्रभावी मानले जातात.
नियम ७२ हा एक साधा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला सांगतो की तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल. उदाहरणार्थ, एखाद्या योजनेतील तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ८% दराने व्याज मिळत असेल, तर तुमचे पैसे ९ वर्षांत दुप्पट होतील (७२/८ = ९). आर्थिक नियोजन करताना हा नियम वापरणे फायदेशीर ठरते. कारण यामुळे तुमची गुंतवणूक वाढण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अचूक अंदाज लावता येतो.
नियम ११४ तुमची गुंतवणूक तिप्पट करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची गणना करतो. हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदराने किंवा तुमच्या गुंतवणुकीवर मिळण्याची अपेक्षा असलेल्या व्याज दराने तुम्हाला ११४ ला विभाजित करावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही १० टक्के व्याजदर असलेल्या योजनेत गुंतवणूक करत असाल, तर तुमचे पैसे अंदाजे ११.४ वर्षांत तिप्पट होतील (११४/१० = ११.४). नियम ११४ दीर्घकालीन गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य लकर करण्यातही खूप मदत करतो. उदाहरणार्थ, १० वर्षांनंतर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी निधी उभारण्याची योजना करणे खूप सोपे होते.
समजा तुम्ही ५ लाख रुपये गुंतवायचे ठरवले आहे आणि तुम्हाला ६ वर्षांनंतर काही महत्त्वाच्या खर्चासाठी १० लाख रुपयांची गरज आहे. यासाठी तुम्हाला अशी योजना निवडावी लागेल जी वार्षिक १२ टक्के परतावा देईल. तरच नियम ७२ नुसार तुमचे पैसे ७२/१२ मध्ये म्हणजे ६ वर्षांत दुप्पट होतील. कोणतीही निश्चित उत्पन्न योजना नाही जिथे वार्षिक १२ टक्के परतावा मिळू शकेल. म्हणूनच, तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडासारखे पर्याय निवडावे लागतील, जे दीर्घकाळात चांगला परतावा देऊ शकतात.
समजा तुम्ही ५ लाख रुपये गुंतवले आणि १० वर्षांनंतर तुम्हाला १५ लाख रुपयांची गरज आहे. अशा परिस्थितीतही तुम्हाला किमान १२ टक्के वार्षिक परतावा असलेल्या योजनेत गुंतवणूक करावी लागेल. तरच नियम ११४ नुसार, तुमचे पैसे ११४/१२ मध्ये म्हणजे ९.५ वर्षांत तिप्पट होतील. भारतातील निश्चित उत्पन्न योजनांमध्ये गुंतवणूक करून असा परतावा मिळणे शक्य नाही, म्हणून यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इतर उच्च-परताव्याचे पर्याय शोधावे लागतील. वरील उदाहरणे स्पष्टपणे दर्शवतात की नियम ७२ आणि नियम ११४ गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल हे जाणून घेण्यास मदत करतात. हे नियम म्हणजे महत्त्वाची साधने असून त्यांचा वापर करून तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन अधिक प्रभावीपणे तयार करू शकता आणि महागाईवर मात करत गुंतवणुकीला योग्य दिशा देऊ शकता.