Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 750 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: जागतिक तणाव आणि FIIs च्या विक्रीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 750 अंकांनी घसरला, तर निफ्टी 200 अंकांनी घसरला आहे.
Stock Market Crash
Stock Market CrashPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीलाच मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक तणाव, परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या किंमतीतील हालचाल यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे.

आज बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये तब्बल 750 अंकांची घसरण झाली, तर निफ्टीही सुमारे 200 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसला. ऑटो आणि रियल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये जवळपास 1 टक्क्यांची घसरण झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

या घसरणीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली नवीन डेडलाइन. या वक्तव्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर झाला आहे.

Stock Market Crash
Missed Tax Deadline | 31 मार्चची मुदत चुकली? एप्रिलमध्ये कोणत्या गोष्टी सुधारता येतील?

इराणनेही या इशाऱ्याला तीव्र प्रतिक्रिया देत अमेरिकेच्या भूमिकेवर टीका केली आहे. या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमती 110 डॉलरच्या आसपास स्थिर राहिल्या आहेत, जे भारतीय बाजारासाठी नकारात्मक संकेत मानले जात आहेत.

जागतिक संकेतांवर नजर टाकली असता GIFT निफ्टी सुमारे 150 अंकांनी घसरलेला दिसत आहे, ज्यामुळे बाजाराची सुरुवात कमकुवत होण्याची शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अमेरिकन बाजारात काहीशी तेजी दिसून आली होती, त्यामुळे काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता होती.

दरम्यान, सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढल्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोने सुमारे 1.5 लाख रुपयांच्या जवळ पोहोचले, तर चांदीतही वाढ झाली.

Stock Market Crash
Smartphone Price Hike: स्वस्त मोबाईल मिळण्याचे दिवस संपले; स्मार्टफोनच्या किंमती 40 टक्के वाढल्या, काय आहे कारण?

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) सलग 24व्या दिवशी विक्री करत असून त्यांनी सुमारे 7,300 कोटी रुपये बाजारातून काढले आहेत. याउलट, देशांतर्गत गुंतवणूकदार (DIIs) खरेदी करत असून त्यांनी सुमारे 8,100 कोटी रुपये बाजारात गुंतवले आहेत, ज्यामुळे घसरण काही प्रमाणात मर्यादित राहिली.

रेटिंग एजन्सी मूडीजने भारताची Baa3 रेटिंग कायम ठेवली असली तरी मध्यपूर्वेतील तणावामुळे आर्थिक वाढ आणि महागाईवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी RBI कडे अजूनही व्याजदर कपातीची संधी असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या MPC बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असून, व्याजदरात बदल होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news