Missed Tax Deadline | 31 मार्चची मुदत चुकली? एप्रिलमध्ये कोणत्या गोष्टी सुधारता येतील?

Missed Tax Deadline |
Missed Tax Deadline | 31 मार्चची मुदत चुकली? एप्रिलमध्ये कोणत्या गोष्टी सुधारता येतील?
Published on
Updated on

नीलेश पुजारी

आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपल्यामुळे कर नियोजनाची संधी आता संपली आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, तुमची सर्व कामे थांबली आहेत. एप्रिल महिना हा प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि चुका सुधारण्यासाठी एक संधी म्हणून पाहिला जाऊ शकतो. या काळात नेमके काय करता येईल?

कर बचत गुंतवणूक : विमा, भविष्य निर्वाह निधी किंवा कर बचत मुदत ठेवींमध्ये आता गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा मागील आर्थिक वर्षासाठी मिळणार नाही.

वजावट : कलम 80 सी किंवा इतर कलमांखालील वजावटीचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख होती. आता केलेली कोणतीही गुंतवणूक पुढील आर्थिक वर्षासाठी ग्राह्य धरली जाईल. जरी गुंतवणुकीची वेळ निघून गेली असली, तरी ‘अनुपालन’ म्हणजेच नियमांची पूर्तता अद्याप करता येते.

सेल्फ असेसमेंट टॅक्स : जर तुमचा काही कर भरायचा राहिला असेल, तर विवरणपत्र भरताना तुम्ही तो चालू एप्रिल महिन्यात भरू शकता.

कर प्रणालीची निवड : ज्या करदात्यांचे उत्पन्नाचे साधन व्यवसाय नाही, ते विवरणपत्र भरताना ‘जुनी’ किंवा ‘नवीन’ कर प्रणाली निवडू शकतात. यासाठी 31 मार्चची सक्ती नव्हती.

विवरणपत्र दाखल करणे : आर्थिक वर्ष 2025-26 साठीचे विवरणपत्र भरण्यासाठी अद्याप पुरेसा वेळ आहे. साधारणपणे 31 जुलैपर्यंत ही मुदत असते. त्यामुळे आता तुम्ही फॉर्म 26-एएस आणि एआयएस तपासून तयारी करू शकता.

दुरुस्ती आणि सुधारित विवरणपत्र : जर पूर्वीच्या आयटीआरमध्ये काही चुका झाल्या असतील, तर सुधारित विवरणपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, उशिरा सुधारणा केल्यास अतिरिक्तकर किंवा दंड भरावा लागू शकतो.

बँकिंग संबंधित कामे

बँकेशी संबंधित बहुतांश कामांसाठी 31 मार्च ही अंतिम मुदत नसते. ही कामे तुम्ही एप्रिलमध्येही करू शकता.

केवायसी अद्ययावत करणे : तुमचे बँक खाते सक्रिय ठेवण्यासाठी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. हे काम कधीही करता येते.

बंद खाती सुरू करणे : जर दोन वर्षे खात्यातून व्यवहार झाले नसतील तर ते इनऑपरेटिव्ह होते. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही ते पुन्हा सुरू करू शकता.

वारसदार बदलणे : खात्यावर वारसदाराचे नाव नोंदवणे किंवा बदलणे ही प्रक्रिया एप्रिलमध्येही करता येईल.

थोडक्यात सांगायचे तर : 31 मार्च ही तारीख कर बचतीसाठी महत्त्वाची होती; पण सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी एप्रिल हा महिना ‘फॉलो-अप’ घेण्यासाठी उत्तम आहे. गुंतवणुकीतून कर वाचवण्याची संधी हुकली असली, तरी दंड टाळण्यासाठी उर्वरित कामे वेळेत पूर्ण करणे हिताचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news