एक दिवसानंतर पुन्हा तेजी परतली, पण ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'मुळे Auto शेअर्स कोसळले

Stock Market Closing | बँकिंग शेअर्समध्ये तेजी
Stock Market
भारतीय शेअर बाजाराने एक दिवसांच्या घसरणीतून सावरत गुरुवारी (दि.२७) वाढ नोंदवली.(AI Image)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजाराने एक दिवसांच्या घसरणीतून सावरत गुरुवारी (दि.२७) वाढ नोंदवली. सेन्सेक्स ३१७ अंकांनी वाढून ७७,६०६ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १०५ अंकांनी वाढून २३,५९१ वर बंद झाला. विशेष म्हणजे मार्च महिन्यात आतापर्यंत निफ्टी ५० निर्देशांक सुमारे ६ टक्के वाढला आहे.

ऑटो आणि फार्मा वगळ‍ता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज तेजीत बंद झाले. ऑटो १ टक्के घसरला. तर दुसरीकडे निफ्टी पीएसयू बँक (Nifty PSU Bank Index) २.५ टक्के वाढला. निफ्टी फायनान्सियल आणि निफ्टी बँक प्रत्येकी ०.७ टक्के वाढले. बीएसई मिडकॅप ०.४ टक्के आणि स्मॉलकॅप ०.९ टक्के वाढला.

गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फायदा

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २७ मार्च रोजी ३.१३ लाख कोटींनी वाढून ४१४.७४ लाख कोटींवर पोहोचले. ते २६ मार्च रोजी ते ४११.६१ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.१३ लाख कोटींची वाढ झाली.

आजच्या ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन ऑटो आयात शुल्काबद्दलची चिंता काही प्रमाणात दिसून आली. परिणामी काहीवेळ घसरण राहिली. पण बँक आणि आयटी शेअर्सनी सुरुवातीचा तोटा कमी करत लगेच त्याची भरपाई केली.

कोणत्या शेअर्संना फटका?

बीएसई सेन्सेक्सवर आज बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, इंडसइंड बँक, एलटी, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, टायटन हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे टाटा मोटर्सचा शेअर्स ५.३ टक्के घसरणीसह ६६९ रुपयांवर बंद झाला. सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बँक हे शेअर्सही प्रत्येकी १ टक्के घसरले.

ट्रम्प टॅरिफचा फटका, ऑटो शेअर्स गडगडले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात कार आणि हलक्या ट्रकवर २५ टक्के शुल्क (Trump Auto Tariff) लागू करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे जागतिक ऑटोमोबाईल उद्योगाला धक्का बसला. भारतीय ऑटो कंपन्यांनाही याचा मोठा फटका बसला. आज गुरुवारी शेअर बाजारात आटो कंपन्यांचे शेअर्स घसरले. जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ची मूळ कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्स (Tata Motors Share Price) आज ५ टक्क्यांहून अधिक घसरून ६६१ रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर तो ६६९ रुपयांवर स्थिरावला. त्याचबरोबर अशोक लेलँड, संवर्धन मदरसन, भारत फोर्ज, आयशर मोटर्स हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले.

परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी कायम

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारात खरेदी कायम ठेवली आहे. यामुळे शेअर बाजारातील भावना उंचावल्या आहेत. बुधवारी २६ मार्च रोजी परदेशी गुंतवणूकदार सलग पाचव्या दिवशी निव्वळ खरेदीदार राहिले. त्यांनी एका दिवसात २,२४०.५५ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यातच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सुमारे ११,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. परदेशी निधीचा सततचा ओघ राहिल्याने गुंतवणूकदारांच्या भावना लक्षणीयरीत्या उंचावल्या आहेत.

Stock Market
‘एनएफओ’मध्ये नुकसान झालंय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news