Stock Market | RBI च्या निर्णयानंतर बाजारात चढ-उतार; सेन्सेक्स- निफ्टी सपाट

FMCG स्टॉक्समध्ये घसरण
Stock Market, Sensex, Nifty
शेअर बाजारात बुधवारी (दि.९) चढ-उतार दिसून आला.(file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्याजदराबाबतच्या तटस्थ धोरणाच्या निर्णयानंतर शेअर बाजारात बुधवारी (दि.९) चढ-उतार दिसून आला. त्यानंतर सेन्सेक्स- निफ्टी सपाट झाले. सेन्सेक्स १६७ अंकांनी घसरून ८१,४६७ वर बंद झाला. तर निफ्टी ३१ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,९८१ वर स्थिरावला. विशेष म्हणजे बीएसई सेन्सेक्सने दिवसाच्या उच्चांकावरून सुमारे ८५० अंक गमावले. निफ्टी ५० निर्देशांक उच्चांकावरून २५२ अंकांनी खाली आला. आरबीआयच्या रेपो दर ६.५ टक्के एवढा कायम ठेवण्याच्या निर्णयानंतर बँकिंग आणि नॉनबँकिंग फायनान्शिएल कंपन्यांचे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत वाढले.

Nifty FMCG निर्देशांक १.५ टक्क्यांनी घसरला

क्षेत्रीय निर्देशांकांत एफएमसीजी १.५ टक्क्यांनी घसरला. इतर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. फार्मा, पॉवर, रियल्टी निर्देशाक १ ते २ टक्क्यांनी वाढले. BSE मिडकॅप निर्देशांक १ टक्के आणि स्मॉलकॅप १.२ टक्के वाढून बंद झाला.

RBI Monetary Policy : रेपो दर 'जैसे थे'

आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी RBI च्या पतधोरणाबाबत भूमिका बदलून तटस्थ केली. आरबीआयच्या (RBI) पतविषयक धोरण समितीने (RBI Monetary Policy) सध्याचा रेपो दर ६.५ टक्के एवढा कायम ठेवलाय. रेपो दरात एप्रिल २०२३ पासून कोणताही बदल केलेला नाही. तो सलग दहाव्यांदा जैसे थे ठेवला आहे. आरबीआयच्या तीन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर (MPC) आज गर्व्हनर दास यांनी व्याजदराबाबतचा निर्णय जाहीर केला.

बाजारात आज नेमकं काय घडलं?

शेअर बाजारात सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली होती. सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगली वाढ नोंदवली होती. पण त्यानंतर ही तेजी अधिक वेळ टिकून राहिली नाही. अखेरच्या तासात विक्री झाल्याने दोन्ही निर्देशांकांत किरकोळ घसरण झाली.

Sensex Today | कोणते शेअर्स टॉप लूजर्स, टॉप गेनर्स?

सेन्सेक्सवर आयटीसी, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, इंडसइंड बँक, एलटी, एचडीएफसी बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर टाटा मोटर्स, एसबीआय, टेक महिंद्रा, मारुती, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, एचसीएल टेक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले.

BSE Sensex
सेन्सेक्सवर टाटा मोटर्सचा शेअर्स सर्वाधिक वाढला.(BSE Sensex)

निफ्टीवर आयटीसी, नेस्ले इंडिया, ओएनजीसी, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. तर सिप्ला, ट्रेंट, टाटा मोटर्स, एसबीआय, टेक महिंद्रा हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले.

NSE Nifty
आज निफ्टी ३१ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,९८१ वर स्थिरावला.(NSE)
Stock Market, Sensex, Nifty
RBI Monetary Policy | रेपो दर ६.५ टक्के एवढा कायम! कर्जाच्या EMI वर काय परिणाम?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news