Stock Markets | सेन्सेक्स- निफ्टी हिरव्या रंगात बंद, बँकिंग शेअर्समध्ये खरेदीचा जोर

IT, फार्मा शेअर्स घसरले
Stock Market Closing Bell, Sensex, Nifty
सेन्सेक्स आज १४४ अंकांनी वाढून ८१,६११ वर बंद झाला.(File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ला गुरुवारी (दि. १०) उच्च (इंट्राडे) पातळी राखता आली नाही. पण दोन्ही निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स १४४ अंकांनी वाढून ८१,६११ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १६ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,९९८ वर स्थिरावला. आज विशेषतः मेटल आणि बँकिंग शेअर्सध्ये तेजी राहिली.

ठळक मुद्दे

Summary

सेन्सेक्स १४४ अंकांनी वाढून ८१,६११ वर बंद.

निफ्टी १६ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,९९८ वर स्थिरावला.

बँकिंग शेअर्समध्ये खरेदीचा जोर.

निफ्टी बँक निर्देशांक १ टक्के वाढला.

IT, फार्मा शेअर्समध्ये घसरण.

बीएसई मिडकॅप ०.३ टक्के घसरला.

स्मॉलकॅप ०.४ टक्के वाढला.

बाजारात आज नेमकं काय घडलं?

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आणखी व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. यामुळे भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूक वाढण्याच्या शक्यतेने भारतीय शेअर बाजार गुरुवारी तेजीत खुला झाला होता. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५१३ अंकांनी वाढून ८१,९८० वर पोहोचला. तर निफ्टी २५,१०० पार झाला होता. पण त्यानंतर ही तेजी कमी झाली.

आयटी निर्देशांक १.२ टक्के घसरला

क्षेत्रीय निर्देशांकातील आयटी १.२ टक्के घसरला. फार्मा निर्देशांक २ टक्के आणि रियल्टी निर्देशांकात ०.४ टक्के घसरण झाली. तर निफ्टी बँक निर्देशांक १ टक्के, पॉवर ०.७ टक्के आणि मेटल निर्देशांक ०.३ टक्के वाढीसह बंद झाला. तसेच मिडकॅप शेअसमध्ये विक्रीचा दबाव राहिला. तर स्मॉलकॅपमध्ये खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप (BSE MidCap) ०.३ टक्के घसरला. तर स्मॉलकॅप ०.४ टक्के वाढला.

Sensex Today : कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर कोटक बँकचा शेअर्स ४ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर एचडीएफसी बँक, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवर ग्रिड, एम अँड एम, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, एनटीपीसी हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के वाढले. तर सन फार्मा, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टायटन, टाटा मोटर्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले.

BSE Sensex
सेन्सेक्सवर कोटक बॅँकेचा शेअर्स टॉप गेनर ठरला.(BSE)

निफ्टीवर कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडसइंड बँक १ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर सिप्ला, टेक महिंद्रा, ट्रेंट, सन फार्मा, इन्फोसिस आदी शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी घसरले.

NSE Nifty
निफ्टी ५० निर्देशांक १६ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,९९८ वर स्थिरावला.(NSE)
Stock Market Closing Bell, Sensex, Nifty
वेगाने संपत्ती वाढविण्याचा मूलमंत्र टॉपअप एसआयपी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news