Stock Market Updates | बजेटपूर्वी गुंतवणूकदारांची सावध भूमिका, सेन्सेक्स- निफ्टी सपाट

कोणते शेअर्स तेजीत?
Stock Market Sensex Nifty
उद्या मंगळवारी होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी सपाट झाले.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

उद्या मंगळवारी होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे आज सोमवारी (दि.२२) सेन्सेक्स (Sensex) सुरुवातीच्या व्यवहारात ३५० अंकांनी खाली आला. त्यानंतर त्यात लगेच रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास १०० हून अधिक अंकांनी वाढून ८०,७०० वर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) २४,५०० वर होता. सुरुवातीच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण दिसून आली. (Stock Market Updates)

Stock Market Sensex Nifty
Mutual funds : म्युच्युअल फंडावर कर्ज घेताय? जाणून घ्या अधिक

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर्स २.५ टक्क्यांनी घसरून ३,०३० रुपयांपर्यंत खाली आला. त्याचबरोबर कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक हे शेअर्सही घसरले आहेत. तर एनटीपीसी, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, टाटा स्टील, इन्फोसिस हे शेअर्स तेजीत आहेत. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.

Stock Market Sensex Nifty
क्रेडिट स्कोअर का सुधारत नाही?

निफ्टीवर विप्रो, रिलायन्स, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक हे टॉप लूजर्स आहेत. तर एनटीपीसी, बीपीसीएल, एचडीएफसी बँक, ग्रासीम, पॉवर ग्रिड हे टॉप गेनर्स आहेत.

आशियाई बाजारात घसरण

अन्य आशियाई बाजारातही घसरण दिसून आली आहे. MSCI च्या जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्स निर्देशांकात १ टक्के घसरण झाली. गेल्या आठवड्यात हा निर्देशांक ३ टक्क्यांनी खाली आला होता. जपानचा निक्केई निर्देशांक १.१ टक्के, दक्षिण कोरियाचा निर्देशांक १.५ टक्के आणि तैवानच्या बाजारात २ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी

दरम्यान, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) १९ जुलै रोजी १,५०६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ४६१ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली होती.

Stock Market Sensex Nifty
युलिप योजनांमध्ये गुंतवणूक करताना...

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news