Stock Market Today | सेन्सेक्स- निफ्टी किरकोळ वाढीसह बंद, IT शेअर्स चमकले

शेअर बाजारात आज नेमकं काय घडलं?
Stock Market Today
भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज मंगळवारी (दि.२५) सपाट पातळीवर बंद झाले.(AI Image)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जवळपास १ टक्के वाढीसह खुले झाल्यानंतर भारतीय बेंचमार्क निर्देशांक (Stock Market Today) आज मंगळवारी (दि.२५) सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ३२ अंकांनी वाढून ७८,०१७ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १० अंकांच्या किरकोळ वाढीसह २३,६६८ वर स्थिरावला. सहा दिवसांच्या वाढीनंतर काही प्रमाणात गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंगचा पर्याय निवडला. परिणामी निफ्टी आणि सेन्सेक्सची वाढ मर्यादित राहिली.

आयटी आणि खासगी बँकांच्या शेअर्संनी मोठ्या घसरणीतून सावरण्यात निर्देशांकांना आधार दिला. आयटी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज घसरणीसह बंद झाले. निफ्टी आयटी १.३ टक्के वाढला. ऑटो, कॅपिटल गुड्स, कन्झ्यूमर ड्युराबेल्स, मेटल, ऑईल अँड गॅस, पॉवर, पीएसयू बँक, रियल्टी, टेलिकॉम १ ते १.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप १.१ टक्के आणि स्मॉलकॅप १.६ टक्के घसरला.

Sensex Today | 'झोमॅटो'ला फटका

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, ॲक्सिस बँक, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक हे शेअर्स १ ते ४ टक्के दरम्यान वाढले. तर झोमॅटोचा शेअर्स (Zomato share price) ५ टक्क्यांहून अधिक घसरला. तर इंडसइंड बँकेचा शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक खाली आला. त्याचबरोबर अदानी पोर्ट्स, एम अँड एम, रिलायन्स, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, सन फार्मा, टाटा स्टील हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले.

एनएसईवर २,९९८ शेअर्समध्ये व्यवहार

एनएसईवर एकूण २,९९८ शेअर्समध्ये व्यवहार दिसून आला. यातील ६७४ शेअर्स तेजीत राहिले. तर २,२५८ शेअर्समध्ये घसरण झाली. ६६ शेअर्समध्ये कोणताही चढ-उतार दिसून आला नाही.

अमेरिकेच्या घोषणेनंतर सुरुवातीला बाजारात तेजी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, जरी शुल्क लवकरच लागू होणार असले तरी, २ एप्रिल रोजी सर्व शुल्क लागू केले जाणार नाही. काही देशांना या शुल्कातून सूट मिळू शकते. या घोषणेनंतर आज बाजारात सुरुवातीला तेजी दिसून आली होती. पण ही तेजी अधिक वेळ टिकून राहिली नाही.

परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीचा जोर कायम

२४ मार्च रोजी सलग तिसऱ्या दिवशी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) खरेदी कायम ठेवली. त्यांनी काल एका दिवसात ३,०५५.७६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. दरम्यान, याच दिवशी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ९८.५४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

दरम्यान, आज आशियाई बाजारात तेजीचे वातावरण राहिले. जपानचा निक्केई सुमारे १ टक्के वाढला.

Stock Market Today
Stock Market | शेअर बाजारात उत्साह कायम, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news