

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे मंगळवारी (दि.१ एप्रिल) भारतीय शेअर बाजारात (Stock Market) घसरण दिसून आली. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास सेन्सेक्स सुमारे ३५० अंकांनी खाली आला होता. त्यानंतर सेन्सेक्समध्ये (Sensex) काही प्रमाणात रिकव्हरी झाली. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स २०० अंकाच्या घसरणीसह ७७,२०० च्या खाली होता. निफ्टी ५० निर्देशांक ( Nifty) २० अंकांच्या किरकोळ वाढीसह २३,५०० जवळ व्यवहार करत आहे.
आयटी शेअर्सवर अधिक दबाव दिसून येत आहे. निफ्टी आयटी १.६ टक्के घसरला. रियल्टी शेअर्समध्येही विक्री दिसून आली. निफ्टी ५० निर्देशांक बीएसई मिडकॅप ०.३ टक्के आणि स्मॉलकॅप ०.२ टक्के वाढला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २ एप्रिल रोजी परस्पर शुल्क म्हणजे रेसिप्रोकल टॅरिफ (Reciprocal tariffs) लागू करण्याची घोषणा करतील. या पार्श्वभूमीवर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टीसीएस, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले. तर इंडसइंड बँक, एम अँड एम, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, नेस्ले इंडिया हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के वाढले.