Stock Market | आयातशुल्काची छाया, तरीही दिशा वरचीच, 'हे' शेअर्स कमबॅक करतील

भारतातील फार्मा सेक्टरला वाढीव आयात शुल्काचा फार मोठा फटका बसण्याची शक्यता
Stock Market
आयातशुल्काची छाया, तरीही दिशा वरचीच(Pudhari File Photo)
Published on
Updated on
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

दीर्घ कालावधीनंतर सप्ताहात FIIS नी मोठी खरेदी केली. या तीनही घटनांनी बाजाराने खरे म्हणजे खूप मोठी उसळी घ्यायला हवी होती. परंतु, 2 एप्रिलला ट्रम्प Reciprocal tariffs ची घोषणा करतील. त्यामुळे बाजार उसळी घेण्याच्या मनस्थितीत नाही.

9 एप्रिलला होणार्‍या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या मीटिंगमध्ये व्याजदर कपातीची जोरदार शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून Q4 चे आणि एकूण वर्षाचेही आर्थिक निकाल येण्यास सुरुवात होईल. ज्यांच्यापासून बाजाराला कार्पोरेट अर्निंग्ज् वाढण्याची मोठी आशा आहे.

युएसमध्ये आयात होणार्‍या सर्व मोटारींवर आणि ऑटो कंपोनंटस्वर 25 टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा मागील आठवड्यात ट्रॅम्प प्रशासनाने केली आणि टाटा मोटर्स, भारत फोर्ज, सोना बीएमडब्ल्यू आणि संवर्धन मदरसन हे शेअर्स घसरले. महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती हे शेअर्सही आठवड्यात तीन टक्के तुटले.

भारतातील फार्मा सेक्टरला वाढीव आयात शुल्काचा फार मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, फार्मा सेक्टरमधील बहुतेक कंपन्यांचा रेव्हेन्यू अमेरिकेतूनच येतो. त्यातही ग्रॅन्युल्स इंडिया, नॅटको फार्मा, ग्लँड फार्मा, मार्कसन्स फार्मो या कंपन्यांचा रेव्हेन्यू अमेरिकेवर प्रचंड प्रमाणावर अवलंबून आहे. या शेअर्सना त्याचा जोरदार फटका बसेल.

फार्माबरोबर केमिकल सेक्टरचीही निर्यात मोठ्या प्रमाणात युएसला होते. विशेषतः टाटा केमिकल्सचा यात मोठा वाटा आहे. परंतु, केमिकल सेक्टरची दुसरी बाजूही आहे. ट्रम्प यांचा चीनविरोधी रोख पाहता आयात शुल्क वाढले, तरी भारतीय केमिकल्सचा हिस्सा अमेरिकन बाजारपेठेत वाढण्याची शक्यता अधिक आहे.

सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी BSE च्या शेअरने 16 टक्क्यांपेक्षा अधिक मुसंडी मारली. CDSL, BSE, KFintech, Angel One, Cams या शेअर्सच्या वाढीचे कारण मागच्याच सप्ताहातील लेखात सांगितले होते आणि ते म्हणजे बाजारात दिसू लागलेली तेजी. त्याला दुसरेही आणखी एक कारण आहे, हे म्हणजे या शेअर्सना वाढणार्‍या Tariff ची काहीही झळ लागणार नाही. त्यामुळे इथून पुढेही या शेअर्समधील तेजी काही काळ तरी अखंड राहील, असे वाटते.

असेच tariff चा धोका नसलेले आणखी एक सेक्टर म्हणजे Financial Sector, Chola Finance, Bajaj Finance, LIC Housing Finance, PFC, SBI Card, REC यांचे चार्टस पाहिले, तर हे सर्व शेअर्स मोठी झेप घेण्याच्या पावित्र्यात आहेत, असे वाटते. बजाज फिसर्व्हने आठवड्यात साडेआठ टक्के वाढ नोंदवून त्याने 2000 चा आकडा पार केला. बजाज फायनान्स त्याचा पूर्वीचा 9,260 हा उच्चांक पार करून 10,000 वाढण्यास उत्सुक आहे.

निफ्टी फार्मा इंडेक्स मागील सप्ताहात तीन टक्के घसरला. परंतु, Zenith Drugs या फार्मा कंपनीला दिनांक 28 रोजी 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. (CMP Rs. 71.70) जेनेरिक ड्रग्ज बनविणारी ही एक शानदार कंपनी आहे. 12.8 पीई रेशो आहे. 123 कोटींचे मार्केट कॅप असणारी ही एक मायक्रो कॅप कंपनी आहे. ROCE 27.4%, ROE 26.4 % आहे. 100 रुपयांच्या आत भाव असणारे दर्जेदार शेअर्स खूप जणांना हवे असतात. त्यांच्यासाठी हा उत्कृष्ट शेअर आहे.

वरीलप्रमाणेच Innovana Think labs ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील कंपनी. या शेअरलाही 28 तारखेला 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. (CMP Rs. 297) या शेअरचा उच्चांकी भाव रु. 738 आहे. तीन वर्षांचा सरासरी ROE 25.8, ROCE 3.2, तर Profit Growth 29.3 आहे. पी.ई. 14.8 आहे. सातत्याने नफा मिळविणारी ही कंपनी आहे. रु. 738 पासून तुटलेला हा शेअर चार्टवर Bottom Out होण्याचे संकेत देत आहे.

ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या Correction मध्ये उत्कृष्ट फंडामेंटल्स असलेले काही दर्जेदार स्टॉकसही मंदीच्या तडाख्यात सापडले. खाली असेच काही Most Beaten स्टॉक्स देत आहे. एप्रिलमध्ये त्यांच्या वार्षिक आणि Q4 निकालाकडे बारकाईने लक्ष ठेवा. ज्यांचे निकाल चांगले येतील. ते शेअर्स Come Back ठरतील, एवढे नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news