Stock Market Closing Bell | शेअर बाजारात यू- टर्न! BSE बाजार भांडवल ४५० लाख कोटी पार

'या' दिग्गज शेअर्समुळे बाजार सावरला
BSE Sensex
सेन्सेक्स आज ५३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,९९६ वर बंद झाला.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

शेअर बाजारात शुक्रवारी (दि.५) चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स (Sensex) आज ५३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,९९६ वर बंद झाला. निफ्टी (Nifty) २१ अंकांनी वाढून २४,३२३ वर स्थिरावला. सेन्सेक्सची सुरुवात आज सुमारे ५०० अंकांच्या घसरणीसह झाली होती. मुख्यतः हेवीवेट एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील घसरणीने बाजाराला (Stock Market Updates) खाली ओढले. पण रिलायन्स, एसबीआय शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला उभारी मिळाली आणि सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. दरम्यान, बाजारात चढ-उतार असतानाही आज बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४५० लाख कोटी पार झाले.

Summary

ठळक मुद्दे

  • सेन्सेक्स ५३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,९९६ वर बंद.

  • निफ्टी २१ अंकांनी वाढून २४,३२३ वर स्थिरावला.

  • एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील घसरणीने बाजाराला खाली ओढले.

  • बीएसई सेन्सेक्सवर एचडीएफसी बॅंक शेअर्स ४ टक्क्यांनी घसरला.

  • रिलायन्स, एसबीआय शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला उभारी.

  • बीएसई मिडकॅप, स्मॉलकॅप प्रत्येकी ०.७ टक्क्यांनी वाढून बंद.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) सुमारे ५०० अंकांनी घसरून ७९,५०० वर आला होता. तर निफ्टी (Nifty) २४,२०० पर्यंत खाली आला होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांक सावरले आणि ते सपाट पातळीवर बंद झाले.

BSE Sensex
आयकर : ‘एआयएस’ कसा डाऊनलोड करावा?

क्षेत्रीय आघाडीवर काय झाले?

क्षेत्रीय निर्देशांकात कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, ऑईल आणि गॅस, पॉवर प्रत्येकी १ टक्के वाढले. निफ्टी फार्मामध्येही वाढ झाली. पण निफ्टी बँकमध्ये घसरण दिसून आली. दरम्यान, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.७ टक्क्यांनी वाढून बंद झाले.

कोणते शेअर्स वाढले, कोणते घसरले?

सेन्सेक्स आज ७९,७७८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो घसरून ७९,५०० च्या खाली आला. पण आजच्या ट्रेडिंग सत्रात तो काहीवेळ ८०,१०० पर्यंत वाढला. त्यानंतर तो ५३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,९९६ वर बंद झाला. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेचा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरून १,६५० रुपयांपर्यंत खाली आला. त्याचबरोबर टायटन, एम अँड एम, इंडसइंड बँक, टाटा स्टील, टाटा मोटर्स हे शेअर्सही घसरले. तर रिलायन्स, एसबीआय, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एलटी, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, आयटीसी हे शेसर्अ तेजीत राहिले.

BSE Sensex
सेन्सेक्सवरील शेअर्स.BSE

निफ्टीवर ओएनजीसी, रिलायन्स, एसबीआय, ब्रिटानिया, सिप्ला हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांदरम्यान वाढले. तर एचडीएफसी बँक, टायटन, LTIMindtree हे शेअर्स घसरले.

NSE Nifty50
निफ्टी ५० वरील ट्रेडिंग आलेख.NSE

निफ्टी बँकमध्ये घसरण

निफ्टी बँक निर्देशांकातील व्यवहारात आज अस्थिरता दिसून आली. प्रामुख्याने एचडीएफसी बँक शेअर्स घसरणीमुळे बँक निफ्टी खाली आला. निफ्टी बँक निर्देशांक ०.८ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १ टक्के घसरला.

BSE Sensex
गुंतवणूक : आजीवन मोफत क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news