

डॉ. विजय ककडे
SEBI ची Past Risk and Return Verification Agency (PaRRVA) ‘पर्व’ ही एक डिजिटल फ्रेमवर्क आणि अॅप सुविधा आहे.
पर्व ही व्यवस्था चुकीच्या विक्रीच्या (mis-selling) प्रथांना आळा घालण्यासाठी मदत करते, कारण ती जोखीम-परतावा (risk-return) संबंधित माहितीची पडताळणी करून ती अचूक, विश्वासार्ह आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी पारदर्शक असल्याची खात्री देते, जेणेकरून गुंतवणूकदारांना अप्रमाणित दाव्यांवर अवलंबून राहावे लागू नये.
गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे तसेच त्यांची अर्थ साक्षरता वाढवणे यासाठी राष्ट्रीय स्तरावर सेबी ही संस्था सातत्याने प्रयत्न करीत आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत अनेकदा अपुरी आणि चुकीची माहिती मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरते. अनेकदा गुंतवणूक सल्लागार स्वतःच्या फायद्यासाठी विशिष्ट सल्ला देत असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे व गुंतवणूकदारांना खात्रीशीर माहिती उपलब्ध करणे यासाठी ‘पर्व’ (PaRRVA) ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
‘पर्व’ याचा अर्थ मागील कामगिरी व परतावा आणि जोखीम याची पडताळणी करणारी व्यवस्था असा आहे. याचे अॅप सेबीने दिले असून 4 मे पासून ही सेवा कार्यरत केली आहे. यात पंधरा वर्षांचा अनुभव असणारी 100 कोटींची मालमत्ता असणारी संस्था अशी सेवा देऊ शकते.
गुंतवणुकीमध्ये पारदर्शी तसेच खरी माहिती उपलब्ध करून देणे व त्याच्या आधार पूर्वीच्या कामगिरीचे दावे तपासून गुंतवणुकीचा निर्णय घेणे शक्य होणार आहे. छोट्या गुंतवणूकदारांना अनेकदा माहिती मिळत नाही. नोंदणी नसलेले वित्तप्रभावक् अतिरंजीत परताव्याचे आश्वासन देतात. त्यावर या सुविधेमुळे प्रतिबंध होईल. बाजारात केवळ 35 टक्के गुंतवणूकदार शेअरबाजारचे समज असलेले आहे. पर्व ही प्रणाली सेबी नोंदणीकृत पडताळणी संस्था म्हणून काम करते. तर राष्ट्रीय रोखे बाजार NSE डेटा सेंटर म्हणून काम करते. या सुविधेतून तुलनात्मक खरा परतावा समजू शकेल. झटपट नफ्याच्या अपेक्षेने गुंतवणूक करणार्यांचे प्रमाण 25 टक्के इतके मोठे असून, त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. पर्व व्यवस्था आधुनिक तंत्राचा वापर करत गुंतवणूकदारांना संरक्षित करण्याचे एक महत्त्वाचे साधन ठरते.