

RBI On Plastic Currency: भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी एमपीसी बैठकीतील निर्णय जाहीर केले त्यावेळी आरबीआय गुव्हर्नरने रेपो रेट स्थीर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर अजून एक मोठी अपडेट देखील दिली. ही अपडेट पॉलीमर किंवा प्लास्टिकच्या नोटांबाबत असून गेल्या काही दिवसात केंद्र सरकार १० रूपये आणि २० रूपयाच्या पॉलीमर नोटा जारी करण्यासाठी केंद्रीय बँकेच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. आता आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या नोटा कधी लाँच करणार याची माहिती दिली आहे.
संजय मल्होत्रा यांनी RBI MPC Results ची घोषणा करताना आर्थिक वर्ष २०२८ च्या सुरूवातीला पॉलीमर किंवा प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी आम्ही सतत तयारी करत आहोत. एमपीसी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी पॉलीमर नोटांचा पालयट प्रोजेक्ट सुरू आहे. या नोटा बाजारात आणण्यापूर्वी त्याचे टेस्टिंग केले जाईल.
आरबीआयकडून १० आणि २० रूपयाच्या प्लास्टिक नोटांबाबत अर्थ मंत्रालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी संसदेतील प्रस्तावाला मान्यता दिली होती. सरकारने १० आणि २० रूपयांच्या पॉलीमर नोटांसाठी फिल्ड ट्रायल प्रपोजलला मंजूरी दिली होती.
सरकारने याबाबत संसदेत माहिती देतना १० रूपये आणि २० रूपयाच्या प्रत्येकी १०० करोड पॉलीमर नोटांचे फिल्ड ट्रायल घेतली जाईल. जर ट्रायल यशस्वी झाली तर प्लास्टिक नोटा नियमित स्वरूपात चलनात आणण्याचे प्लॅनिंग आहे.
सरकारने १० आणि २० रूपयांच्या प्लास्टिक नोटांच्या ट्रायलला परवानगी मिळाली आहे. त्याचवेळी स्पष्ट करण्यात आलं की सध्याच्या कागदी नोटांवर याता काही परिणाम होणार नाही. कागदी नोटा बंद होणार नाहीत. त्या प्लास्टिकच्या नोटांसोबतच बाजारात चलनात राहणार आहेत. सरकारने सध्या तरी कागदी नोटांना प्लास्टिकच्या नोटांनी पूर्णपणे रिप्लेस करण्याचा कोणताही प्रस्ताव नाहीये.
पॉलीमर नोटांची लाईफ ही कागदी नोटांपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. सध्याच्या घडीला प्लास्टिक नोटांची ही योजना सुरूवातीच्या टप्प्यात आहे. भारतात प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे काम सुरू आहे. मात्र प्लास्टिकच्या नोटा वापरण्याची सुरूवात ऑस्ट्रेलियाने १९८८ मध्येच केली होती. आता जवळपास ५० देशात प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये आहेत. ही नोट पारंपरिक नोटेपेक्षा जास्त काळ टिकते. तसेच नकली नोट तयार करणे देखील अवघड होते.